ETV Bharat / bharat

छत्तीसगढमध्ये नक्षली हल्ला, जखमी मराठी असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव हुतात्मा - Chhattisgarh breaking news

छत्तीसगढच्या सुकमा येथील ताडमेटला परिसरात नक्षलवाद्यांनी एका आयईडीचा स्फोट घडवला आहे. यात कोब्रा 206 बटालियनचे १० जवान जखमी झाले आहेत. यात जखमी झालेले असिस्टंट कमांडंट हुतात्मा झाले आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 29, 2020, 4:56 AM IST

Updated : Nov 29, 2020, 10:28 AM IST

सुकमा (छत्तीसगढ) - येथील ताडमेटला परिसरात झालेल्या चकमकीत सीआरपीएफच्या कोब्रा २०६ बटालियनचे असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव यांना वीरमरण आले आहे. ते मूळचे नाशिकमधील आहेत. त्यांना माना येथील चौथ्या बटालियनच्या परेड ग्राउंडवर मानवंदना दिली जाईल. यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक तसेच सीअआरपीएफचे अधिकारी यावेळी उपस्थित असतील. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी पाठवण्यात येणार आहे. आईडी स्फोटात ते गंभीर जखमी झाले होते. येथील ताडमेटला परिसरात नक्षलवाद्यांनी एक आयईडी स्फोट केला. या स्फोटात कोब्रा 206 बटालियनचे 10 जवान जखमी झाले आहेत. त्यातील ३ जणांची प्रकृती गंभीर आहे.

नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव यांना वीरमरण

रायपूर येथील रुग्णालयात भालेराव यांचे पोस्टमार्टम करण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव रायपूरवरून विमानाने मुंबई येथे आणले जाईल. तेथून वाहनाने अथवा हेलिकाॅप्टरने पार्थिव नाशिकला आणून त्यांच्या कुटुंबियांकडे सपुर्द केले जाईल. या ठिकाणी लष्करी इतमामात मानवंदना देऊन अंतिम संस्कार केले जातील. २०१० सालापासून भालेराव सीआरपीएफच्या २०६ कोब्रा बटालियनमध्ये कर्तव्य बजावत होते. भालेराव हे इंदिरानगर परिसरात राहत होते. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

यापूर्वीही केला होता नक्षल्यांनी हल्ला

सुकमा येथे नक्षली घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. 21 नोव्हेंबरला नक्षल्यांनी पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून कोटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन तरुणांची हत्या केली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांचा शोध सुरू केला होता.

मार्च महिन्यात झाला होता मोठा हल्ला

छत्तीसगडमधील सुकमा येथे मार्च महिन्यात माओवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली होती. यात गोळीबारानंतर 17 जवान बेपत्ता झाले होते. यावेळी ड्रोनच्या माध्यमातून शोधमोहीम राबवण्यात आली होती. त्यामध्ये 17 जवानांचे मृतदेह आढळले होते. चिंतागुफा येथील मीनपा जंगलामध्ये 250 ते 300 जवान सुरक्षा दलांनी माओवादीविरोधी मोहीम हाती घेतली होती. दिवसभर मोहीम राबवल्यानंतर वेगवेगळ्या तुकड्यांच्या मार्फत जवान आपल्या कॅम्पकडे परतत होते. त्यावेळी माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. यामध्ये 17 जवान हुतात्मा झाले. तर 14 जखमी जवानांना रायपूर इथल्या रुग्णालयात दाखल केले होते.

हेही वाचा - पंतप्रधान मोदी आज 'मन की बात' मधून देशवासीयांना संबोधणार

Last Updated : Nov 29, 2020, 10:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.