पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबरला होणार आहे. तत्पूर्वी या टप्प्यातील प्रचाराचा आज अंतिम दिवस आहे. पहिल्या टप्प्यात ७१ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्याच्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी ५ वाजता थंडावणार आहेत. मतदानाच्या प्रार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.
२८ ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात एकूण १ हजार ०६६ उमेदवार रिंगणात आहेत. बुधवार दिनांक २८ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होईल. मात्र, वेगवेगळ्या मतदारसंघात मतदान संपन्याचा कालावधी वेगवेगळा निश्चित करण्यात आला आहे.
मतदानाची वेळ-
३६ विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ लवकरच समाप्त होणार आहे. निवडणूक आयोगाने ठरवल्यानुसार पहिल्या टप्प्यात ४ जागांवर सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर २७ मतदारसंघामध्ये सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान केले जाईल. पहिल्या टप्प्यात ५ ठिकाणी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाचा वेळ दिला आहे. उर्वरीत ३५ जागेंवर सकाळी ७ वाजल्यापासून सायं ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.
पहिल्या टप्प्यातील १४ जागा या मागासवर्गीयांसाठी राखीव आहेत. या टप्प्यात मतदान होणारे काही मतदार संघ हे नक्षलग्रस्त भागातील आहेत. त्यामध्ये चैनपूर, नवीनगर, कुटंबा याबरोबरच जमुई जिल्ह्याती अनेक मतदारसंघांचा समावेश आहे.
मतदान का समय | विधानसभा मतदारसंघ संख्या |
सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान | ४ |
सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान | २७ |
सकाळी ७ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत मतदान | ५ |
सकाळी ७ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत या विभागात होईल मतदान | ३६ |
- सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत या विभागात होईल मतदान
चैनपूर |
नवीनगर |
कुटुंबा |
रफीगंज |
- सकाळी ७ ते सांयकाळी ४ वाजेपर्यंत या विभागात होईल मतदान
कटोरिया |
बेलहर |
तारापूर |
मुंगेर |
जमालपूर |
सूर्यगड |
मसौढ़ी(राखीव) |
पालीगंज |
चिनारी |
सासाराम |
काराकाट |
गोह |
ओबरा |
औरंगाबाद |
गरूआ |
शेरघाटी |
इमामगंज |
बाराचट्टी |
बोधगया |
टिकारी |
रजौली |
गोविंदपूर |
सिकंदरा |
जमुई |
झाझा |
चकाई |
- सकाळी ७ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत या विभागात होईल मतदान
अरवल |
कुर्था |
जहानाबाद |
घोसी |
मखदुमपूर |
- सकाळी ७ ते सांयकाळी ६ वाजेपर्यंत या विभागात होईल मतदान
कहलगाव | सुल्तानगंज | अमरपूर धौरैया | बांका | लखीसराय |
शेखपुरा | बरबीघा | मोकामा | बाढ़ | बिक्रम |
संदेश | बड़हरा | आरा | अगियाव | तरारी |
जगदीशपूर | शाहपूर | ब्रह्मपुरा | बक्सर | डुमराव |
राजपूर | रामगढ़ | मोहनिया | भभुआ | करगहर |
दिनारा | नोखा | डेहरी | गया टाउन | बेलागंज |
अतरी | वजीरगंज | हिसुआ | नवादा | वारसलीगंज |
नक्षल प्रभावित मतदारसंघाची हेलिकॉप्टरने निगरानी-
पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव नक्षल प्रभावित मतदार संघात अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. कोणत्याही आपतकालीन घटनेस तोंड देण्यासाठी २४ तास सुरू राहणारी कंट्रोल रुम उभारण्यात आली आहे. ज्यांच्या मार्फत ईव्हीएम घेऊन गेल्यानंतर आपली कामगिरी सुरू करतील. नक्षल प्रभावित भागात नजर ठेवण्यासाठी २ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.