ETV Bharat / bharat

गुड न्यूज: कोवॅक्सिन लसीच्या पहिल्या टप्प्यात प्रगती...ट्रालयचा पहिला भाग पूर्ण

रोहतकमधील पीजीआय संस्थेत 17 जुलैपासून कोवॅक्सिन लसीची मानवी चाचणी सुरु करण्यात आली आहे. या पहिल्या टप्प्यातील पहिल्या भागाची चाचणी पूर्ण झाल्याचे संस्थेने सांगितले आहे.

कोवॅक्सिन
कोवॅक्सिन
author img

By

Published : Jul 26, 2020, 1:58 PM IST

चंदिगढ - भारतीय बनावटीच्या कोरोना विरोधातील ‘कोवॅक्सिन’ या लसीच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरु झाल्या आहेत. भारत बायोटेक कंपनी, राष्ट्रीय विषाणू संस्था आणि आयसीएमआर या तीन संस्थाच्या प्रयत्नाने कोरोवरील लस तयार करण्यात येत आहे. हरियाणातील पोस्ट ग्रॅज्युइट इस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स(PGI) या संस्थेत पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरु आहे. या पहिल्या टप्प्यातील पहिल्या भागाची चाचणी पूर्ण झाल्याचे संस्थेने सांगितले आहे.

कोवॅक्सिन लसीची पहिल्या टप्प्यात प्रगती...ट्रालयचा पहिला भाग पूर्ण

‘आता दुसऱ्या भागाची मानवी चाचणी सुरु आहे. या अंतर्गत 6 स्वयंसेवकांना लसीचा डोस देण्यात आल्याचे’ क्लिनिकल ट्रायलच्या प्रमुख तपासणीस डॉ. सविता वर्मा यांनी सांगितले. चाचणीच्या पहिल्या फेजमधील पहिला भाग झाला आहे. यामध्ये देशभरातील 50 स्वयंसेवकांना डोस देण्यात आला. याचा निकाल सकारात्मक आला आहे, असे त्यांनी सांगितले.

रोहतकमधील पीजीआय संस्थेत 17 जुलैपासून कोवॅक्सिन लसीची मानवी चाचणी सुरु करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी 3 स्वयंसेवकांना लस देण्यात आली होती. कोवॅक्सिन ही लस हैदराबादेतील भारत बायोटेक या कंपनीकडून तयार करण्यात आली आहे. ही लस बनविण्यात आयसीएमआर आणि एनआयव्ही या दोन संस्थांनी सहकार्य केले आहे. भारतीय बनावटीची ही लस असून सकारात्मक निकाल येत असल्याने सर्वांच्या आशा वाढल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.