नवी दिल्ली - आसामच्या बागवानमध्ये दिसणाऱ्या दृष्यांवर रॉक ग्रुप ‘डीप पर्पल’ खूप खूश झाला असता. त्यांच्या रॉक गीतातील अशक्य वाटणाऱ्या कल्पना सत्यात उतरताना त्यांना पहायला मिळाल्या असत्या. ‘पाण्यातून धूर निघत असताना आणि आगीचे प्रचंड लोळ आकाशात जात असताना’ असे या लोकप्रिय रॉक गीताचे शब्द आहेत.
ऑइल इंडिया लिमिटेडच्या (ओआयएल) बाघजान रिगपासून सुमारे दोन किमी अंतरावर असलेल्या अनिल उरंग यांनी सांगितले की, ‘बाघजानमध्ये एक दिवस असे दिसेल असे मला कधीच स्वप्नातही वाटले नव्हते.’ येथील आकाशात प्रचंड ज्वालांचे लोळ उठले. तेथून निघत असलेला धूर जलाशयांसह सभोवतालच्या हिरव्यागार परिसरात पसरला आणि पाहता-पाहता आगीने भीषण रूप धारण केले.
केळीची झाडे, ‘तमुल’ (सुपारी), झुडपे, फळ देणारी झाडे आणि आजूबाजूची शेती काळी पडली होती. वायू आणि तेलाच्या दरम्यानचे घनपदार्थ अत्यंत ज्वलनशील असतात आणि सुमारे 47 अंश तापमानातही त्यांना आग लागते.
27 मे रोजी अहमदाबादमधील ‘जॉन एनर्जी’ या खासगी कंपनीतर्फे ‘वर्क ओव्हर’ हे ऑपरेशन बागवानमघील विहीर क्रमांक 5 वर सुरू होते. यादरम्यान, अचानकपणे जोरदार स्फोट झाला आणि प्रोपेन, मिथेन आणि प्रोपलीनसहित गॅस वेगाने बाहेर पडला. ‘वर्क ओव्हर’ हे तेल किंवा गॅस विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात देखभाल किंवा उपाययोजना करण्याचा उपक्रम आहे. ‘ब्लो आऊट’ म्हणजे विहिरीतील तेल किंवा वायूची अनियंत्रितपणे बाहेर उसळणे.
“जेव्हा गॅस गळती होत होती, तेव्हा लढाऊ विमानासारखा, मोठा कानांचे दडे बसवणारा आवाज येऊ लागला. त्याचबरोबर दाट पांढऱ्या धुराचा लोट वेगाने आकाशात उडाला. हे दिवस बरेच दिवस चालू होते आणि आवाजामुळे लोकांना रात्री झोप येत नव्हती,' असे उरंग म्हणतात.
आतापर्यंत ओआयएलच्या अग्निशमन दलाच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सुमारे सहा जण जखमी झाले आहेत. जवळपास आठ हजार लोकांना सुरक्षित अंतरावरील 12 आश्रयस्थानांमध्ये हलविण्यात आले आहे. तर, मालमत्ता, वनस्पती आणि वातावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
'मागुरी मोटापंग' वेटलँड आणि डिब्रू-सैखोवा नॅशनल पार्कच्या अगदी जवळच असलेल्या बागजानमध्ये निवांतपणा आहे. तेथील रहिवाश्यांना त्यांच्या पायाखाली नैसर्गिक वायूचे प्रचंड मोठे साठे असल्याची कल्पनाही नाही. जवळजवळ 4 हजार 500 पीएसआय (पाउंड प्रति चौरस इंच) एवढे प्रचंड साठे येथे आहेत. त्यामुळे हा प्रदेश नैसर्गिक वायूचा मोठा उत्पादक आहे. सर्वात नामांकित व्यक्तींपैकी एक. अंदाज येण्यासाठी, एखाद्या चारचाकी वाहनात साधारण 33 पीएसआय एवढा नैसर्गिक वायू आहे. काही वर्षांपूर्वीच, हे अल्फा अतिरेक्यांचे केंद्रस्थान होते. येथे ते घातक शस्त्रे घेऊन मुक्तपणे फिरत होते.
“ऑपरेटिंग प्रक्रिया खूप चांगल्या प्रकारे तयार केल्या जातात. त्यामुळे अशा घटना फारच दुर्मीळ असतात. आणि जेव्हा त्या घडतात तेव्हा बहुतेक वेळा मानवी चुकांमुळे होते. प्रक्रियात्मक त्रुटी आणि मानक सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले जात नाही, तेव्हा मानवी चुका घडण्याची शक्यता असते,' असे ओआयएलसोबत बाघजान गॅस क्षेत्रात काम केलेल्याएका तज्ज्ञाने सांगितले.
“ही आता एक मोठी प्रक्रिया असेल. रिग काढावी लागेल. परिसर मोकळा करावा लागेल. योग्य प्रकारे रोधन कार्य केल्यानंतर क्रेनसारखी ऑपरेटिंग उपकरणे आणावी लागतील. जवळच एक पाण्याचा साठा खोदून तयार केला पाहिजे. याला एक महिना, महिने किंवा त्याहून अधिक काळ लागू शकेल,” असे या तज्ज्ञाने सांगितले. या तज्ज्ञाने “वर्क ओव्हर” ऑपरेशनवर दोन वर्षे काम केले आहे. आता एका खासगी कंपनीत काम करत असल्याने त्याने आपले नाव न घेण्याची विनंती केली.
(लेखक - ज्येष्ठ पत्रकार संजीब केआर बरुआह)