नवी दिल्ली - झाकिर नगर भागामध्ये एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीत सापडून ६ जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका लहान बालकाचा समावेश आहे. जखमींना होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इमारतीत अडकलेल्या २० जणांची सुटका करण्यात आली आहे. आग विझवताना २ अग्निशमन दलाचे कर्मचारीही जखमी झाले आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांनी दिली. ७ चारचाकी वाहने आणि ८ दुचाकीही आगीत जळून खाक झाल्या आहेत. ८ अग्निशमन दलाचे बंब आग विझवत आहेत.
५ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. तर ५ जणांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. माला यांनी सांगितले