सॅनफ्रान्सिस्को- कॅलिफोर्नियातील जंगलांमध्ये भीषण आग लागली आहे. ही आग २७ सप्टेंबरला लागली होती. या आगीत ८ हजाराहून अधिक वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, राज्यातील ३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
आगीला विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. मात्र, तिला नियंत्रणात आणण्यात जवानांना अद्याप यश आलेले नाही. सीएनएनने दिलेल्या अहवालानुसार, कॅलिफोर्नियाच्या वनीकरण आणि अग्नि सुरक्षा विभागाने, नेपा आणि सोनोमा वाईन प्रदेशात मोठ्या प्रमाणात आग लागल्याची माहिती दिली असून, ६२ हजार ३६० एकर जमीन आगीच्या कचाट्यात सापडल्याचे सांगितले आहे. आगीत बऱ्याच इमारतींना नुकसान झाले आहे. तसेच, अजूनही नुकसान होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंची कोरोनावर मात