दिल्ली - दिल्लीतील गांधीनगर मार्केटला मंगळवारी मोठी आग लागली. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या २१ गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
गांधीनगर मार्केट नवी दिल्लीतील शहदरा परिसरात असून हे आशिया खंडातील सर्वांत मोठी कापडाची बाजारपेठ आहे. येथे दररोज दिवसभरात १० हजार ते २० हजार लोक भेट देतात.