ETV Bharat / bharat

'कन्नड डेली'च्या वरिष्ठ पत्रकाराविरोधात बंगळुरूमध्ये एफआयआर दाखल

'कन्नड डेली' या वृत्तपत्रात निखिल आणि त्याचे आजोबा एच.डी देवेगौडा यांच्यात झालेल्या वादाबाबत बातमी प्रसिद्ध झाली आहे. याविरोधात तक्रार देताना प्रदिप कुमार यांनी म्हटले आहे, की अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. ही बातमी खोटी असून पूर्णत: कल्पनेच्या जोरावर लिहिण्यात आली आहे.

कन्नड डेलीत छापून आलेली बातमी
author img

By

Published : May 27, 2019, 10:07 PM IST

बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी विरोधात कथितरित्या अपमानकारक बातमी छापली होती. या प्रकरणी बंगळुरू पोलिसांनी कन्नड डेलीचे वरिष्ठ पत्रकार विश्वेश्वर भट यांच्या विरोधात एफआयआर दाखल केले आहे. जनता दल (धर्मनिरपेक्षवादी) सरचिटणीस प्रदिप कुमार यांनी भट यांच्या विरोधात तक्रार दिली होती.

'कन्नड डेली' या वृत्तपत्रात निखिल आणि त्याचे आजोबा एच.डी देवेगौडा यांच्यात झालेल्या वादाबाबत बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीत असे लिहिले आहे, की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर निखिल कुमारस्वामी आणि एच.डी देवेगौडा यांच्यात बाचाबाची झाली होती. एच.डी देवेगौडा यांनी निखिलची राजकीय कारकिर्द नाजूक अवस्थेत आहे. त्याच्यासाठी खर्च केलेला पैसा काढून घेतला पाहिजे. असे देवेगौडा यांनी निखिलला सुनावले आहे. याविरोधात तक्रार देताना प्रदिप कुमार यांनी म्हटले आहे, की अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. ही बातमी खोटी असून पूर्णत: कल्पनेच्या जोरावर लिहिण्यात आली आहे.

मंड्या लोकसभा मतदारसंघातून निखिल कुमारस्वामी यांचा सुमलथा अंबरिश यांनी १ लाख २५ हजार ३८२ मतांनी पराभव केला होता. सुमलथा यांना एकूण ७ लाख १ हजार १२२ मते पडली होती. तर, निखिलला ५ लाख ७५ हजार ४० मते पडली होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.