किशनगंज - बिहार निवडणुकीचा पहिला टप्पा नुकताच पार पडला आहे. सर्व पक्षांकडून आता बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार करण्यात येत आहे. प्रचारादरम्यान किशनगंज जिल्ह्यातल्या अमौर विधानसभा मतदारसंघात एमआयएमच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत माहिती दिली. जदयूच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एमआयएमचे बिहार प्रदेशाध्यक्ष अख्तरुल इमान हे या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये 35 जण जखमी झाल्याची माहिती जलील यांनी दिली आहे. दरम्यान आम्ही याची तक्रार पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे केली असून, त्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याचे जलील यांनी सांगितले.