ETV Bharat / bharat

दिल्लीतील लोकनायक रुग्णालयात रुग्णाने महिला डॉक्टरसोबत केले वाईट कृत्य

नवी दिल्लीतील लोकनायक रुग्णालयात रुग्णाने एका महिला डॉक्टरसोबत वाईट कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित डॉक्टरला वाचविण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांवर देखील रुग्णांनी हल्ला केला.

corona virus in delhi  corona virus in india  delhi corona virus updates  india corona virus new cases  delhi news  delhi latest news corona virus  महिला डॉक्टर के साथ दुर्व्यवहार  female doctor allegedly assaulted in LNJP  Lok Nayak Hospital delhi
दिल्लीतील लोकनायक रुग्णालयात रुग्णाने महिला डॉक्टरसोबत केले वाईट कृत्य
author img

By

Published : Apr 15, 2020, 11:51 AM IST

नवी दिल्ली - राजधानीतील लोकनायक रुग्णालयात रुग्णाने एका महिला डॉक्टरसोबत वाईट कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित डॉक्टर सर्जिकल वार्ड येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करत होत्या. यावेळी ही घटना घडली.

संबंधित महिला डॉक्टरसोबत वाईट कृत्य घडल्याचे समजताच पुरुष डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी आले. मात्र, त्या दोघांनाही रुग्णांनी घेराव घातला. त्यांनी केलेले कृत्य पाहून डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ सर्वांनी आपला जीव वाचविण्यासाठी स्वतःला एका खोलीमध्ये बंद करून घेतले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांना बोलावण्यात आले. त्यांनी सर्व रुग्णांना शांत करून परिस्थिती आटोक्यात आणली.

दिल्लीमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. गेल्या काही दिवसात आकडा झपाट्याने वाढत असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. त्यातही सोमवारी एका दिवसात ३५६ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे आता चिंता अधिकच वाढली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.