जयपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहेत. मात्र, या परिस्थितीत मध्यमवर्गीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नुकतच शेतकऱ्यांनी आपल्या रब्बी पिकांची काढणी केली होती. मात्र, याच दरम्यान लॉकाऊन घोषित केल्याने शेतकरी आपले धान्य बाजार समितीपर्यंत पोहोचवू शकत नव्हते. अशात ईटीव्ही भारतने त्यांची ही व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचवली.
लॉकडाऊनच्या तिसऱ्याच दिवशी ईटीव्हीने अनेक भागातील चिंताग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा सर्वांसमोर आणली. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जागा नसून ते सध्या आपले धान्य बाजार समितीत पोहोचवण्याच्या प्रयत्नात असल्याचे वृत्त ईटीव्हीने प्रसारित केले. यासोबतच या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी केली.
ईटीव्हीने राजस्थानच्या कुकरखेडासह अनेक बाजारपेठांमध्ये जात वास्तवाची चौकशी केली. व्यापाऱ्यांकडून याबद्दलची माहिती घेतली, की त्यांच्यापर्यंत नवे धान्य पोहोचत आहे का? ज्यानंतर तात्काळ मदतीचा विश्वास शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिला गेला. यानंतर आता सरकारने ऑनलाईन पास बनवण्याचा पर्याय शेतकऱ्यांना दिला आहे
आता शेतकरी गुगल प्लेवरुन राजस्थान सरकारचे कृषि बाजार समितीसंबंधीचे अॅप डाऊनलोड करुन आपल्या जवळच्या धान्य बाजारापर्यंत शेतीमाल पोहोचवण्यासाठी ई-पास मिळवू शकतात. ही प्रक्रिया सध्या सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे