भारत बंदमध्ये सहभागी असण्याचे विरोधी पक्षांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आम्हीही यात सहभागी आहोत, असे द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी आज स्पष्ट केले.
'दिल्ली चलो' आंदोलनाचा १२वा दिवस; दररोज वाढतोय शेतकऱ्यांना देशभरातून मिळणारा पाठिंबा.. - शेतकरी आंदोलन दिल्ली
12:58 December 07
भारत बंदमध्ये आमचा सहभाग आहेच - स्टॅलिन
12:36 December 07
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसदेचे विशेष सत्र आयोजित करा; पंजाब काँग्रेसच्या खासदारांची मागणी
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन मागवण्यात यावे अशी मागणी पंजाब काँग्रेसच्या खासदारांनी केली आहे. या अधिवेशनामध्ये हे शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यात यावेत. सध्या सरकार हे अधिवेशन घेण्यास टाळाटाळ करत आहे, हे लोकशाही विरोधी आहे असे खासदार मनिष तिवारी म्हणाले आहेत.
12:30 December 07
तृणमूल शेतकऱ्यांच्या पाठिशी, मात्र बंदला पाठिंबा नाही - सौगता रॉय
तृणमूल काँग्रेस हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. मात्र, भारत बंद साठी आमचा पाठिंबा नसणार आहे असे टीएमसीचे खासदार सौगता रॉय म्हणाले.
10:33 December 07
अरविंद केजरीवाल सिंघू सीमेवर दाखल..
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सिंघू सीमेवर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील काही मंत्रीही उपस्थित आहेत.
08:45 December 07
भारत बंदला मायावतींचाही पाठिंबा..
शेतकऱ्यांच्या भारत बंदला मायावतींनीही आपला पाठिंबा दर्शवला आहे. आठ तारखेच्या या बंदमध्ये बसपही शेतकऱ्यांचे समर्थन करत आहे, अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी याबाबत माहिती दिली.
08:43 December 07
सिंघू सीमेला केजरीवाल देणार भेट; उत्तर प्रदेश सरकारच्या तयारीची करणार पाहणी..
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज सिंघू सीमेला भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत दिल्ली सरकारमधील काही मंत्रीही उपस्थित असतील. उत्तर प्रदेशने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी केजरीवाल सीमेला भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
07:58 December 07
सिंघू सीमेवर तळ ठोकून आहेत शेतकरी..
आज आंदोलनाच्या बाराव्या दिवशीही सिंघू सीमेवर शेतकरी तळ ठोकून आहेत. आंदोलनाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी स्पष्ट केले होते, की आपल्याकडे कित्येक महिने पुरेल एवढे सामान आपण घेऊन आलो आहोत. दिल्लीमधील कडाक्याची थंडीही शेतकऱ्यांना आंदोलन करण्यापासून रोखू शकत नाही, हेच या छायाचित्रांमधून दिसून येतं..
07:27 December 07
'दिल्ली चलो' आंदोलनाचा १२वा दिवस..
नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो आंदोलनाचा आज (सोमवार) बारावा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून दिवसेंदिवस अधिक पाठिंबा मिळत आहे. सुरुवातीला केवळ पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि गुजरातमधील शेतकरीही दिल्ली सीमेच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिवाय, आपापल्या राज्यांमध्येही शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत.
आठ डिसेंबरला भारत बंद..
आतापर्यंत शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये झालेल्या चर्चांच्या फेरींमधून कोणताही तोडगा समोर आला नाहीये. यापुढील चर्चेची फेरी ९ डिसेंबरला पार पडणार आहे. त्यापूर्वी आठ डिसेंबरला भारत बंद ठेवण्याचे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे. या भारत बंद दरम्यान आपत्कालीन सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही याबाबत आपण विशेष काळजी घेणार असल्याचे शेतकरी संघटनांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
भारत बंदला विविध पक्षांचा पाठिंबा..
शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला आम आदमी पार्टी, तेलंगणा राष्ट्र समिती आणि महाविकास आघाडीनेही पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दिल्ली, तेलंगणा आणि महाराष्ट्रात हा बंद मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्याची चिन्हे आहेत. या पक्षांसोबत एकूण १२ पक्षांनी
शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट..
केवळ आपल्या देशामध्येच नव्हे, तर जगातील १७ ते १८ देशांना धान्य पुरवण्याचे काम पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी करतात. त्यामुळे तेथील शेतकरी जर रस्त्यावर उतरला आहे, तर त्याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. मात्र, ती केंद्र सरकारने घेतलेली दिसत नाही, असे टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे. याप्रकरणी चर्चा करण्यासाठी पवार हे 9 डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.
हेही वाचा : दिल्ली सीमेवर हजारो शेतकऱ्यांचा मुक्काम, चपात्या बनवण्यासाठी यंत्रांचा वापर