नालगोंडा - जिल्ह्यातील मिऱ्यालागुडा गावात एका कुटुंबाने एकत्र आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या कुटुंबामध्ये एकूण तीन सदस्य होते. आर्थिक अडचणींमुळे कीटकनाशक औषध पिऊन करुन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये १२ वर्षाचा मुलगा लोहित आणि त्याची आई परेपल्ली चित्रकला (वय ४०) या दोघांचा मृत्यू झाला असून, वडील लोकेश (वय ४५) यांची प्रकृती गंभीर आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी लोकेश यांनी आपल्या आई-वडिलांना पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये त्यांनी, बाबा मला माफ करा, मला जगण्याचा अधिकार नाही, असे म्हणत वडिलांना आपल्यावरील एक लाख रुपयांचे कर्ज फेडण्याची विनंती केली. लोकेशने आधी काही ठिकाणी नोकरी केली आहे, मात्र तो त्याने समाधानी नव्हता. त्यामुळे त्याने पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली.
माझ्या मोठ्या मुलाने १०० वेळा फोन केले. मात्र त्याला उत्तर मिळाले नाही, अशी माहिती लोकेशच्या वडिलांनी दिली. घटनास्थळी पोलीस पोहोचले तेव्हा लोकेश अत्यवस्थ होता, त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.