ETV Bharat / bharat

आयएस दहशतवाद्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकांसह आत्मघातकी हल्ल्यातील जॅकेट ताब्यात

शनिवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने चकमकीनंतर धौला कुआं येथून इस्लामिक स्टेटचा (आयएस) संशयित दहशतवादी अबू युसूफ याला अटक केली होती. त्याच्या चौकशीत तो दिल्ली आणि उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहिती समोर आली आहे. अयोध्येतील राम मंदिरही त्याच्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

दहशतवादी अबू युसूफ न्यूज
दहशतवादी अबू युसूफ न्यूज
author img

By

Published : Aug 23, 2020, 2:20 PM IST

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये आयएसचा संशयित दहशतवादी अबू युसूफ याच्या घरातून आत्मघातकी हल्ल्यात वापरल्या जाणाऱ्या जॅकेटसह मोठ्या प्रमाणात स्फोटके ताब्यात घेण्यात आली आहेत.

शनिवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने चकमकीनंतर धौला कुआं येथून इस्लामिक स्टेटचा (आयएस) संशयित दहशतवादी अबू युसूफ याला अटक केली होती. त्याच्या चौकशीत तो दिल्ली आणि उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहिती समोर आली आहे. अबू युसूफ बलरामपूरचा मूळचा रहिवासी असून सध्या बांधकाम सुरू असलेले अयोध्येतील राम मंदिरही त्याच्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बलरामपूरमधील एका स्मशानात युसूफ कुकर बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करत होता. तसेच, एक जॅकेट आत्मघातकी हल्ल्यासाठी तयार केले होते. याआधी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून दहशतवादी अबू यूसुफ याचा नातेवाईक मजहर याला अटक करण्यात आली होती. दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या अबू युसूफ याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्याच्या वडिलांसह आणखी तिघांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे.

दहशतवादी अबू युसूफ बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी मजहर याने दुबग्गा पोलिसांना फोन केला होता. त्याला पोलिसांनी सर्वांत आधी अटक केली. तो दहशतवादी यूसुफचा नातेवाईक आहे. पोलिसांनी त्याला येथील दुबग्गा येथील फिरदौस कॉलनीतून अटक केली होती.

यासह संपूर्ण उत्तर प्रदेशात 'अलर्ट' जारी करण्यात आला आहे. काल रात्री अनेक ठिकाणी एटीएस आणि पोलिसांच्या पथकांनी छापेमारी केली. सध्या अनेक लोक एटीएसच्या रडारवर आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.