नवी दिल्ली - पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला केवळ २ दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी आम्ही पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. दरम्यान, त्यांची मागील ५ वर्षे आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीविषयी मत जाणून घेतले. तर, देशातील विविध मुद्यांवर त्यांनी उत्तरे दिली.
प्रश्न १ - मागच्या ५ वर्षांत तुमच्या मते सरकारने सर्वात मोठी कामगिरी कोणती केली?
मोदींचे उत्तर - सामान्यतः आपल्या देशातील सरकार एक किंवा दोनच मुद्दे हाताळते. मागच्या मनमोहन सिंग यांच्या सरकारबद्दल बोलायचे झाल्यास, काँग्रेस केवळ मनरेगा-मनरेगाचा पाढा वाचत असते. त्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीही नाही. ही पूर्वीची परंपरा होती. मात्र, माझ्याकडे गुजरातचा मोठा अनुभव होता. गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून मी अनेक काळ सरकार चालवले आहे. त्यामुळे मी 'मल्टी डायमेंशनल' किंवा अनेक मुद्यांवर एकाच वेळी काम करत असतो. एकावेळीच अनेक निर्णय घेण्याचा माझा स्वभावच आहे. माझ्या मते देश आणि राजकारण एकत्र चालत असले तरी खऱ्या अर्थाने देश चालवण्यासाठी सर्वच महत्त्वाच्या मुद्यांना नियोजित करणे आवश्यक असते.
या सर्व गोष्टी एका नियोजित वेळेत करणेही अपेक्षित आहेत. या सर्व गोष्टींना पाहिले तर माझ्या कार्यकाळात असा कोणताही विभाग नाही जेथे मी विविध निर्णय घेतलेले नाहीत. कमीत कमी त्या विभागांमध्ये मी नविन काही तरी करण्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे कोणीही माझ्या कामांना २०-२५ गोष्टीत बांधून ठेऊ शकत नाही. माझ्या कार्यकाळातील प्रत्येक निर्णय मोठे आहेत. तसेच परिवर्तन आणणारे आहेत. यासाठी माझा मंत्र होता रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म. या ३ गोष्टींना घेऊनच आमची सरकार समोर चालत आहे.
प्रश्न २ - मागच्या ५ वर्षात आपल्यासाठी सर्वात संतोषजनक मुद्दा कोणता होता ?
मोदींचे उत्तर - पहा, सरकारच्या दृष्टीने पहायचे झाल्यास आपल्याला २०१४ पूर्वीच्या सरकारचा आढावा घ्यावा लागेल. २०१४मध्ये देशभरात निराशा पसरलेली होती. काय होणार? कसे होणार? काय झाले? अशाच चर्चा देशभरात होत होत्या. तर, भ्रष्टाचाराचे मुद्दे माध्यमांमध्ये 'हेडलाईन' असायची. देशात पॉलिसी पॅरालिसिसवर चर्चा व्हायची. मात्र, आज देशाला आस्था, विश्वास आहे. भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात जा तेथे पहा, सर्वत्र बदल झालेला दिसतो. हाच बदल मला संतोष देतो.
प्रश्न ३ - या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि NDA २७२ जागा जिंकणार हे आपल्याला कशावरून वाटते? २०१४च्या निवडणुकांच्या तुलनेत यावेळी स्थिती वेगळी आहे. विरोधी पक्ष विविध राज्यात आघाडी करत आहेत. तर महाआघाडीवर तुमचे काय मत आहे ?
मोदींचे उत्तर - मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मी अगदी नवीन होतो. आता देशाने ५ वर्षात माझे काम पाहिले आहे. मी कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतो त्यांना ठाऊक आहे. माझ्या जगण्याची पद्धत आता लोकांना माहीत झाली आहे. दुसरीकडे मागील ३० वर्षांतील अस्थिरतेचा काळ आहे. तोही जनतेने पाहिला आहे. त्यानंतर स्थिरता काय असते हे लोकांनी अनुभवले आहे. त्याचा परिणाम काय होतो हे जनतेला माहिती आहे.
भारतासारख्या देशाला स्थिरतेची गरज आहे. देशाला मजबूत सरकार हवी आहे. सामान्य नागरिकांनाचीही हिच इच्छा आहे. माझ्या कार्यकाळात मी जे कोणतेही यशस्वी निर्णय घेऊ शकलो ते सर्व स्थिरतेमुळेच शक्य झाले. आम्ही देशाला एक असे मॉडेल दिले ज्यामध्ये आमच्याकडे बहुमत असतानाही आम्ही राज्याच्या आकांक्षा पूर्ण केल्या आहेत. सर्वच पक्षांना जोडले आहे. त्यांना जोडून आम्ही खऱ्या अर्थाने मजबूत सरकार दिले आहे.
मला वाटते जनता आम्हाला याच कार्यांमुळे पुन्हा एकदा निवडून देणार आहे. यापूर्वी जनतेच्या मनात मागच्या सरकारप्रती तिरस्कार होता. त्यानंतर लोकांनी गुजरातमधील माझ्या कार्यकाळाची तुलना केली. एकीकडे भारत होता तर दुसरीकडे गुजरात. आता लोकांनाही वाटते मी ईशान्य भारतातही काम करतो. तमिळनाडूतही काम करतो, आंध्रप्रदेशातही काम करतो आणि तेलंगणातही काम करतो. त्यामुळे देशाला एक गती मिळालेली आहे. त्यामुळे मला वाटते की, भारतीय जनता पक्ष मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहे. रालोआलाही मोठ्या जागा जिंकणार आहे.
प्रश्न ४ - महाआघाडीबद्दल तुम्ही काय विचार करता? त्यांचे काय गणित आहे? समाजवादी पक्ष आणि बसपला आघाडीचा कितपत फायदा होणार आहे?
मोदींचे उत्तर - पहा, राजकारणात गणिते चालत नाहीत. राजकारणाचे परिणामच गणित असतात. आम्ही पण उत्तर प्रदेशात निवडणूक लढवली आहे. काँग्रेस-समाजवादी पक्षांनी तेथे मिळून निवडणूक लढवली होती. त्यावेळी लोक म्हणायचे गणित त्यांच्या बाजूने आहे. मात्र, तेथे परिणाम वेगळाच आला. जनतेला 'टोकन फॉर ग्रांटेड' मानण्याची जी परंपरा होती. ज्या ब्लॉकचा नेता आहे त्या ब्लॉकची जनताही त्याच्यासोबत असेल, अशी स्थिती आज नाही.
देश तरुण मतदारांनी भरलेला आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. त्यांना आपले जीवन त्यांच्या परीने जगण्याची इच्छा आहे. त्यांना आपले स्वप्न पूर्ण होताना पहायचे आहेत. त्यांना पहायचे आहे की, एवढा मोठा देश कोण चालवू शकतो.
समजा, तेथे एक आघाडी आहे. मात्र, त्यांच्यापासून संपूर्ण भारताचे चित्र तर बनत नाही. ममता, अखिलेश आणि मायावती सुद्धा हे चित्र बनवू शकत नाहीत. तर, चंद्राबाबू पण ते बनवू शकत नाहीत. हे विखुरलेले लोक आहेत. देशाला यांच्यावर संशय आहे. ते आताही एक-मेकांच्या विरोधात लढत आहेत. ते एकत्र कसे येऊ शकतात.
प्रश्न ५ - देशातील बेरोजगारी आणि शेतीच्या समस्येवर विरोधी पक्ष भाजपला घेरत आहेत. या मुद्याचा भाजपवर काय परिणाम होणार? जर याचा परिणाम भाजपवर होत नसेल तर का?
मोदींचे उत्तर - कोणीही खोटे बोलणार आणि ते स्वीकारणार, अशी जनता आता राहिलेली नाही. पूर्वी बोटावर मोजण्याइतके नेते होते. तर, वृत्तपत्रांचीही संख्या कमी होती. मात्र, आता सूचना पूरवण्याचे माध्यम वाढले आहेत. लोकांजवळ सत्य अगदी वेगाने पोहोचते. आता लोकच तुलना करायला लागले आहेत. त्यामुळे या गोष्टींवर आधीच आकलन करणे चुकीचे आहे. याचे आकलन करण्यासाठी विपक्ष काय म्हणतात हा आधार असू शकतच नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे, जमिनीवरील हकीकत काय? हे आता सामान्य माणूसही विचार करू लागला आहे. पहिल्यापेक्षा रोड जास्त बनत आहेत तर, विना रोजगार हे बनू शकत नाहीत. जर आधीपेक्षा दुप्पट गतीने रेल्वे लाईन टाकल्या जात आहेत. याचा अर्थ लोकांना रोजगार मिळत आहे. पहिल्यापेक्षा मोठ्या प्रमाणात विद्युतीकरण होत आहे तर, रोजगार तर मिळत असतीलच.
पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात एफडीआय (परकीय थेट गुंतवणूक) होत आहे. तर कोणते ना कोणते काम बेरोजगारांना मिळतच असेल. आपल्या देशात जवळपास ६ लाख नवे तज्ज्ञ जुळले आहेत. कोणी डॉक्टर आहे, कुणी वकिल, इंजिनिअर, चार्टड अकाऊंटन्ट, एमबीए आहेत. यांनी स्वतःसाठी उद्योग तर सुरू केला असेलच. उद्योग सुरू केला म्हणजे एक-दोन लोकांना त्यांनी कामही दिले आहेत. आमची एक योजना आहे, मुद्रा योजना. या योजने अंतर्गत जवळपास १७ कोटी लोकांना कर्ज देण्यात आले आहे. यामध्ये ४.२५ कोटी पहिल्यांदाच कर्ज घेणारे आहेत. म्हणजे इतक्या लोकांनी नवा उद्योग सुरू केला आहे. त्यांनी एका व्यक्तीलाही काम दिले असेल तर, हे मोजल्यास विरोधी पक्षांचे पितळ उघडे पडेल.
प्रश्न ६ - शेतकऱ्यांची नाराजी आणि किमान समर्थन मुल्यावर (एमएसपी) तुमचे काय म्हणणे आहे ?
मोदींचे उत्तर - त्याचप्रमाणे आपला शेतकरीही आहे. २००७मध्ये स्वामिनाथन आयोगाचा अहवाल आला. काँग्रेसने २००४ आणि २००९ मध्ये अनेक घोषणा केल्या होत्या. आपण शेतकऱ्यांना सरळ मदत करणार, त्यांना पैसे देणार, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र त्यांनी एकही घोषणा पूर्ण केली नाही. त्यांनी स्वामिनाथन समितीच्या अहवालाला बगल दिली होती. त्यानंतर आमच्या सरकारने समितीचा अहवाल तपासून काढला. त्यावर सविस्तर अभ्यास केला. त्यावरुन शेतकऱ्यांच्या लागत किंमतीपेक्षा दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली.
एवढेच नाही तर, आधीच्या तुलनेत शेतकऱ्यांकडून सर्वात जास्त खरेदी आम्हीच करत आहोत. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलत होतो. त्यांनी मला सांगितले की, ज्यावेळी शरद पवार कृषीमंत्री होते त्यावेळी शेतकऱ्यांचा माल ते ४००-५०० रुपयांनी खरेदी करायचे. मात्र, आपली सरकार शेतकऱ्यांकडून ७००० कोटींची खरेदी करणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलेले नाही ? शेतीला आम्ही आधुनिक बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही घोषणा पत्रात शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजनाही आणलेली आहे. शेतकऱ्यांनी एका वर्षासाठी पाच लाखांचे कर्ज घेतले असेल तर त्यांचे व्याज आम्ही माफ करणार आहोत. हे खूप मोठे निर्णय आहेत. आम्ही मृदा आरोग्य कार्ड योजना आणली. शेती करण्याची पद्धत आधुनिक व्हावी हे त्यामागे कारण होते. आम्ही ई-नाम योजना सुरू केली. त्यामुळे शेतकऱ्यांना खुले बाजार मिळाले. आता शेतकरी संपूर्ण देशभरात बाजाराचे भाव काय आहेत हे सहज पाहू शकतो.
प्रश्न ७ - एवढे सर्व करुनही महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी लॉन्ग मार्च केला. तामिडनाडूतील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या संसद भवनासमोर आंदोलन केले. त्यामागे मग काय कारण होते ?
मोदींचे उत्तर - आंदोलन झाले हे खरे आहे. मात्र, हे आंदोलन किती दिवस चाललेत हेही विशेष आहे. सत्याची ओळख झाल्यानंतर त्यांचा विश्वास वाढला आहे.
प्रश्न ८ - शेतकऱ्यांचे आंदोलन मोकळे फिरणाऱ्या जनावरांबद्दलही होते. त्यांच्यासाठी ही जनावरे मनस्ताप झाली आहेत.
मोदींचे उत्तर - यासाठी आमच्या सराकरने घोषणापत्रामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले आहे. यामध्ये शेतकरीच उर्जा देणार होणार आहे. सोलर पम्पाचा उपयोग केल्यास शेतकऱ्यांची लागत कमी होणार आहे. त्यासोबत मधुमक्षिका पालनही त्याने करावे. जेणेकरुन मधासाठी मोठी बाजारपेठ मिळेल. पोल्ट्री फार्म, मत्स्यपालन करणाऱ्यांनाही मदत पुरवण्याचे काम होणार आहे. पशुपालनातही त्यांना मदत मिळेल. या साऱ्या मुद्यांवर आम्ही विचार करत आहोत. त्यामुळेच दुधाच्या उत्पादनात आज देशामध्ये क्रांती झालेली आहे.
प्रश्न ९ - नानाजी देशमुख यांनी चित्रकुटमध्ये जैविक शेती करण्याला भर दिला आहे. ही गोष्ट आपल्या मतानुसार किती प्रासंगिक आहे?
मोदींचे उत्तर - जैविक शेतीला जागतिक बाजारपेठेत आताही मागणी आहे, असा माझा विश्वास आहे. सिक्कीम आपल्या देशातील जैविक शेती करणारे पहिले राज्य आहे. आपण हिमालयातील राज्य आणि ईशान्य भारतातील राज्यांना यासाठी प्राथमिकता देत आहोत. ज्यामुळे जैविक शेती राष्ट्रीय ओळख बनेल. आधुनिक जनता ही आरोग्यावर विशेष लक्ष देते. यासाठी मागच्या वर्षापासूनच तयारी सुरू केली आहे.
प्रश्न १० - आर्थिक रुपात या प्रकारची शेती यशस्वी होणार याची किती संभावना आहे ?
मोदींचे उत्तर - हिमाचल प्रदेशातील राज्यपाल यांनी एक प्रयोग केला आहे. त्यांनी तेथे जीरो बजेट फार्मिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. तर महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला पद्म पुरस्काराने आपण सन्मानितही केले आहे. याच पद्धतीने आपण नैसर्गिक शेती आणि जैविक शेती यशस्वीपणे करू शकतो.
प्रश्न ११ - काँग्रेसने अनेक दिवसांनतर नोटाबंदीचा मुद्दा उचलला. मल्लिकार्जून खरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. यावर आपले काय म्हणणे आहे? याचा परिणाम काय होईल ?
मोदींचे उत्तर - आपल्या देशात नोटांबदीचा मुद्दा यापूर्वीही चर्चेत राहिला आहे. इंदिरा गांधी यांच्या काळात १०० रुपये सर्वात मोठी रक्कम होती. त्यावेळी यशवंतराव चव्हाण अर्थमंत्री होते. त्यांनी १०० रुपयांची नोट बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी इंदिरा गांधी घाबरल्या होत्या. त्याचा परिणाम आपल्या राजकारणावर होईल. यामुळे आपण कधीच निवडणूक जिंकून येणार नाही, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी हे मोठे पाऊल उचलले नाही.
इंदिरा गांधींच्या काळातच नोटाबंदी झाली असती तर समांतर अर्थव्यवस्थेचा रोग तेव्हाच संपला असता. मात्र आम्ही सत्तेवर आलो तेव्हा हा रोग अधिकच वाढला होता. त्यामुळे आमच्याजवळ काहीच पर्याय नव्हते. देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत एखादी दुसरी अर्थव्यवस्था समांतर चालत असेल तर देशाची अर्थव्यवस्था ढासळली असती. आम्ही सत्तेवर येण्यापूर्वी मनमोहन सिंग यांची सरकार होती. आम्ही सत्तेत आलो त्यावेळी कोणा अधिकाऱ्याच्या गादीखालून पैसे निघायचे. कोणाच्या कपाटातून तर कोणाच्या गॅरेजमधील बोऱ्यात पैसे सापडायचे. ही मोठी चिंतेची बाब होती. यामुळे आम्ही नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. कोटींच्या घरात जे अघोषित संपत्ती होती ती बाहेर आली. ३.५० लाख खोट्या कंपन्या होत्या. एका खोलीत ४००-५०० कंपन्या चालत होत्या. हवाला व्यापार चालायचा. नोटाबंदी केली तर एका झटक्यात या संपूर्ण कंपन्या बंद झाल्यात. मागील ७० वर्षात प्राप्तिकर भरणाऱ्यांची जितकी संख्या होती. ती संख्या आता दुप्पट झाली आहे. हा सर्वात मोठा फायदा नोटाबंदीचा झाला आहे. त्यानंतर यूपीआयच्या माध्यमातून डिजिटल देवाणघेवाण सुरू झाली. मी सत्तेवर आलो तेव्हा देशात दररोज ३ लाख डिजिटल ट्रान्जेक्शन होत होते. आज महिन्यात ८० कोटींची देवाणघेवाण ऑनलाईन होते. हे खरेच ऐतिहासीक आहे. नोटाबंदीनंतर पुन्हा एक गोष्ट झाली. ती म्हणजे देश ईमानदार झाला आहे. जे सुधरण्यास तयार नाहीत भोपाळमधील बातमीनुसार आपणाला माहितच आहे त्यांचे काय होत आहे. भ्रष्टनाथ!
प्रश्न १२ - काही लोकांचे म्हणणे आहे की नोटाबंदीत बंदीतील पूर्ण पैसे परत आले आहेत. काळ्या पैशावर कोणताच परिणाम झालेला नाही ?
मोदींचे उत्तर - अनौपचारिक पैशाला औपचारिक करणे यालाच आम्ही नोटाबंदीचे यश समजतो.
प्रश्न १३ - कर्जबुडव्यांच्या प्रकरणात म्हटले जाते की, विजय मल्याने ९ हजार कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र, सरकारने १३ हजार कोटींची संपत्ती जप्त केली. नीरव मोदी, मेहूल चोक्सी यांना सशरीर भारतात आणण्याची आशा होती. मात्र, मोदी सरकारने ती पूर्ण केली नाही.
मोदींचे उत्तर - काँग्रेस जेव्हा असे म्हणत आहे तेव्हा माध्यमांच्या बांधवांनी त्यांच्या ७० काळातील कर्जबुडव्यांची यादी तपासून काढावी. त्यांच्या काळातही अनेक लोक पळून गेले होते. ते आता कोठे आहेत? त्यांचे काय झाले? हे आकडेही समोर यायला हवेत. काँग्रेसतर त्यांचे गोडवे गात आहे. याच सरकारने मिशेल, सक्सेना आणि तलवारला भारतात आणले आहे. हे आपण का विसरतो.
आमचे उद्दीष्ट स्पष्ट आहे. आम्ही कायद्याच्या संपूर्ण शस्त्रांचा उपयोग करणार आहोत. सर्व कर्जबुडव्यांना आम्ही परत घेऊन येणार. त्यासाठी आम्ही कठोर कायदे आणले आहेत. त्यांची संपत्तीही जप्त केली आहे. विदेशात कायदेविषयक युद्धही आम्ही लढत आहोत. त्यामध्ये आम्हाला यशही येत आहे.