ETV Bharat / bharat

बिहारमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रित, मृत्यूदरही कमी- माजी मंत्री सी.पी.ठाकूर

author img

By

Published : May 1, 2020, 2:20 PM IST

योग्य वेळेत लॉकडाऊन केल्याने कोरोनाचा प्रसार रोखता आला. बिहार राज्याला लॉकडाऊनचा मोठा फायदा झाला असून इतर मोठ्या राज्यांच्या तुलनेत येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

exclusive-interview-of-cp-thakur-on-corona
बिहारमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रित, मृत्यूदरही कमी- माजी मंत्री सी.पी.ठाकूर

पाटणा- बिहारमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनाचा प्रसार नियंत्रणानात आहे. राज्यातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर महाराष्ट्र , दिल्ली, गुजरात आणि राजस्थान यांच्या तुलनेत कमी असल्याचे भाजप नेते माजी आरोग्य मंत्री डॉ. सी.पी.ठाकूर यांनी म्हटले आहे. ईटिव्ही भारतच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

बिहारमध्ये मृत्यू दर कमी

जिथ आजाराचा फैलाव पहिल्यांदा होतो तिथे त्याचा परिणाम जास्त होतो त्यानंतर त्याचा प्रभाव कमी होतो. यामुळे बिहार राज्यात कोरोना विषाणूचा प्रभाव कमी असू शकतो, असे डॉ. सी.पी.ठाकूर म्हणाले आहेत.

कोरोनाचा उपचार शक्य !

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजारावर उपचार पद्धती आणि औषध मिळालेले नाही. मात्र, कोरोना वर नक्कीच औषध उपलब्ध होईल. मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत आहेत. उपचार न मिळाल्यामुळे काही जणांचे जीव गेले आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन ठाकूर यांनी केले.

लॉकडाऊनचा फायदा

योग्य वेळेत लॉकडाऊन केल्याने कोरोनाचा प्रसार रोखता आला. बिहार राज्याला लॉकडाऊनचा मोठा फायदा झाला असून इतर मोठ्या राज्यांच्या तुलनेत येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

कोरोनावरील संशोधन वेगात सुरु

कोरोनावरील औषध,लस शोधण्याचे प्रयत्न संपूर्ण जगात सुरु आहेत. लवकरच यावरील लस तयार होईल अशी आशा ठाकूर यांनी व्यक्त केली. वेगवेगळ्या आजारावंर आपण उपाय शोधला आहे कोरोनावर देखीस उपाय सापडेल, असे ते म्हणाले

कोरोना मध्ये हाइड्रोक्सिक्लोरोक्विन किती परिणामकारक?

कोरोनाच्या उपचारासाठी भारत, अमेरिका आणि इतर देश हायड्रोक्सिक्लोरोक्विनचा वापर करत आहेत. मात्र, ते जास्त प्रभावशाली औषध ठरणार नाही,असे मत ठाकूर यांनी व्यक्त केले.

बिहारमध्ये कमी क्षमतेचा कोरोना विषाणू!

बिहार राज्यातील जे लोक कोरोनाबाधित आहेत ते कमी क्षमतेच्या कोरोना विषाणूमुळे बाधित झाले असावेत. यामुळे येथील मृत्यूदर कमी आहे मात्र हा संशोधनाचा विषय असल्याचे सी.पी. ठाकूर म्हणाले.

AES के विषाणूमुळे मुजफ्फरपुर कोरोनाचा रुग्ण सापडला नाही?

बिहारमधील चमकी आजाराने प्रभावित असणाऱ्या मुझप्फरपुर जिल्ह्यत अद्याप कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम (एईएस) विषाणूच्या आजाराचा सामना केल्याने येथील लोकांच्यामध्ये कोरोनासी लढण्यासाठी आवश्यक प्रतिकारशक्ती निर्माण झाली असावी, असा अंदाज ठाकूर यांनी व्यक्त केला.

वृत्तपत्रामुळे कोरोनाचे संक्रमण होते का?

वृत्तपत्रामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण होत नाही कारण जिथे वृत्तपत्रांची छपाई होते त्या मशीनचे तापमान खूप असते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही. वृत्तपत्रांचे वितरण करताना काळजी घेणे आवश्यक आहे,असे ठाकूर म्हणाले.

मुझफ्फरपूरमध्ये चमकी तापाचा प्रकोप पुन्हा सुरु

कोरोना विषाणूचा प्रसार होत असतानाच मुझफ्फरपुर मध्ये चमकीच्या तापाला पुन्हा सुरुवात झालीय,हे चिंताजनक आहे. कित्येक वर्षांपासून या काळाता लहान मुलांचा मृत्यू होत आहे पण अजून यावर लस तयार झाली नाही, असे ठाकुर यांनी म्हटले आहे.

आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज

बिहारची आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे, राज्याला इतरांवर अवलंबून राहवे लागत आहे ही बाब चांगली नाही. आरोग्य व्यवस्थेत संशोधनालाही महत्व दिले पाहिजे सरकारने याकडे लवकर लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.