श्रीनगर - रिसर्च अॅन्ड अॅनालिसीस विंग म्हणजेच 'रॉ' चे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांनी नुकतेच जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत असलेल फारुख अब्दुल्ला यांची भेट घेतली. मात्र, त्यांच्यामधील भेटीचा तपशील उपलब्ध झाला नाही. अब्दुल्ला आणि दुलत चांगले मित्र असून त्यांनी खूप वेळ चर्चा केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
'मी अब्दुल्ला यांची भेट घेतली नाही. 'याबाबत माझ्याकडे सांगायला काही नाही', असे भेटीबद्दल दुलत यांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले. ही भेट श्रीनगरमधील गुपकर रोड येथील अब्दुल्ला यांच्या घरी १२ फेब्रुवारीला झाली. जम्मू काश्मीर पोलिसांनी या घराचे रूपांतर नजरकैदेत केले आहे. ५ ऑगस्टला काश्मीरची स्वायत्तता हटवल्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
ही बैठक राजशिष्टाचार म्हणून पार पडली. अब्दुल्ला आणि दुलत अनेक चांगले मित्र आहेत, असे म्हणत अधिकाऱ्यांनी या भेटीला जास्त महत्त्व दिले नाही. जनता दल सरकारच्या काळात इंडियन एअरलाईन्सच्या आईसी- ८१४ या विमानाचे अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी मसूद अजहरच्या सुटकेची मागणी केली होती. तेव्हा अब्दुल्लांना अजहरच्या सुटकेसाठी तयार करण्यासाठी दुलत यांना चर्चा करण्यासाठी पाठवण्यात आले होते.