ETV Bharat / bharat

अयोध्या निकाल: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करावा - नितीन गडकरी

author img

By

Published : Nov 9, 2019, 10:20 AM IST

अयोध्या प्रकरणावरील न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी आदर करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

नितीन गडकरी

नागपूर - अयोध्या प्रकरणावरील न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी आदर करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत असताना देशवासियांना त्यांनी आवाहन केले.

र्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करावा - नितीन गडकरी

अयोध्येतील रामजन्मभूमीचा निकाल आज (शनिवार) सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणारा निकाल काहीही असो, सर्वांनी या निकालाचा आदर करावा, असे ते म्हणाले.
पोलिसांकडूनही कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले जात आहे. देशभरामध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. अयोध्या, सर्वोच्च न्यायालय परिसर आणि इतर संवेदनशिल ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे. तसेच कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी ड्रोनद्वारेही निगराणी ठेवण्यात आली आहे.

नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, तसेच कोणतेही भडकाऊ वक्तव्य करु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी सुरक्षा आढावा घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाबाहेरही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Intro:अयोध्या प्रकरणावरील न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी आदर करावा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे...ते सकाळी नागपूर विमानतळावर पत्रकारांन सोबत बोलत होते Body:अयोध्येतील रामजन्मभूमीचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे...सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणारा निकाल काहीही असो सर्वांनी या निकालाचा आदर करावा या करिता पोलिसांकडून आवाहन केलं जातं असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा निकालाचा सन्मान राखण्याचे आवाहन केले आहे

बाईट - नितीन गडकरी- केंद्रीय मंत्री

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.