ETV Bharat / bharat

'ईटीव्ही'ला २५ वर्षे पूर्ण; रामोजी फिल्म सिटीत थाटात पार पडला रौप्यमहोत्सवी सोहळा - Ramoji Rao family Sahari-Raches

रामोजी फिल्म सिटी येथे ईटीव्हीचा रौप्यमहोत्सवाचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यावेळी रामोजी समुहाचे अध्यक्ष रामोजी राव यांचे नातू सुजय यांनी केक कापून आनंद साजरा केला. यावेळी अध्यक्ष रामोजी राव यांच्यासह त्यांचे कुटुंब, कर्मचारी आदी उपस्थित होते.

ईटीव्ही रौप्यमहोत्सव
ईटीव्ही रौप्यमहोत्सव
author img

By

Published : Aug 27, 2020, 9:28 PM IST

Updated : Aug 28, 2020, 9:54 AM IST

हैदराबाद- 'ईटीव्ही'ला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रसंगी रामोजी फिल्म सिटी येथे 'ई टीव्ही'चा रौप्यमहोत्सव मोठ्या थाटात पार पडला. यावेळी रामोजी समुहाचे अध्यक्ष रामोजी राव यांचे नातू सुजय यांनी केक कापून आनंद साजरा केला. या कार्यक्रमाला रामोजी राव यांच्यासह त्यांचे कुटुंब व कर्मचारी उपस्थित होते.

ईटीव्हीच्या कर्मचाऱ्यांनी २५ वर्षांच्या प्रवासतील काही आठवणींना उजाळा दिला. २५ वर्षांपूर्वी २७ ऑगस्टला ईटीव्हीची मुहर्तमेढ रोवली गेली. त्या दिवशी दक्षिण भारतीय टीव्ही जगतात नवीन युगाची सुरुवात झाली होती. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीदेवीने ईटीव्ही चॅनलचे उद्घाटन केले होते. तेव्हा हे चॅनल करमणुकीचे चॅनल होणार असल्याचे ईनाडू समुहाचे अध्यक्ष रामोजी राव यांनी म्हटले होते. तेव्हापासून तेलुगू मनोरंजन विश्वाच्या स्वरुपात मोठा बदल झाला. ईटीव्हीने माध्यम क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाला वाट करून दिली. नवीन तंत्रज्ञांची निर्मिती केली आणि गुणवत्तापूर्ण कार्यक्रम प्रसारित केले. ईटीव्हीमुळे केबल टीव्ही ही तेलुगू कुटुंबातील एक परंपराच झाली. शहर तसेच ग्रामीण भागतही ईटीव्हीच्या विविध कार्यक्रमांनी नागरिकांच्या मनात स्थान निर्माण केले.

ईटीव्ही माध्यमाला २५ वर्षे पूर्ण

व्यवस्थापकीय संचालक सुमन यांच्या नेतृत्वाखाली चॅनलमध्ये काही नवीन बदल घडवून आणले. ईटीव्ही हा पहिला २४ तास चालणारा सॅटेलाईट तेलुगू चॅनल होता. ज्यावेळी नागरिकांना काही गीत ऐकण्यासाठी आठवडाभर वाट पहावी लागायची, त्यावेळी ईटीव्हीने रोज चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली होती. ईटीव्हीवर गायनाचे कार्यक्रम व्हायचे. पादुथा थीय्यागा, या गायन स्पर्धेचा कार्य ईटीव्हीवर प्रसारित व्हायचा. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रम्हण्यम हे करत होते. त्यानंतर, ईटीव्ही चॅनलने काही धारावाहिक देखील प्रसारित केल्या. अंथरांगालू, अन्वेशिता, लेडी डीटेक्टटीव्ह, गुप्पेडू मानासू या धारावाहिक इतक्या गाजल्या की त्या आजही लोकांच्या मनात घर करून आहेत.

यावेळी फक्त मोठेच नवे तर, लहान मुलांसाठी देखील मनोरंजक कार्यक्रम चॅनले प्रसारित केले होते. त्यामुळे, हे मुलांचेही आवडते चॅनल ठरले. फक्त मनोरंजनच नव्हे तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना देखील स्थान दिले. चॅनलतर्फे अन्नदाता हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रमही खूप गाजला. त्याचबरोबर, ईटीव्ही न्यूज हे बातम्या देणारे चॅनल देखील प्रसारित झाले. यावर जगाच्या कानाकोपऱ्यातील बातम्या निपक्षपातीपणे मांडल्या जायच्या. त्यामुळे हे चॅनल देखील नागरिकांच्या पंसतीस उतरले. अशी अनेक चॅनल्स असलेल्या ईटीव्ही समुहाने आजही आपल्या प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. तसेच, चॅनलच्या माध्यमातून ईटीव्हीने नवे कलाकार, गीतकार, लेखक आणि तंत्रज्ञ दिले आहेत.

आज ईटीव्ही टीव्ही उद्योगात आघाडीवर आहे. ईटीव्हीचे १ कोटी ११ लाख प्रेक्षक आहेत. ईटीव्ही तेलुगू इंडिया हे युट्यूब चॅनलला तर भरपूर प्रसिद्धी मिळत आहे. या चॅनलला प्रत्येक महिन्यात सरासरी ९० कोटी इतके व्ह्यूज मिळत आहेत. आता चॅनल १०० कोटीच्या उच्चांकाकडे वाटचाल करत आहे. टीव्ही असो किंवा डिजिटल चॅनल असो ईटीव्ही नेहमीच आपल्या गुणवत्तापूर्ण, मनोरंजक कार्यक्रमांमुळे प्रक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ईटीव्ही भारत पुढेही अशीच कामगीरी करत प्रेक्षकांची मने जिकणार, अशी भावना रामोजी राव उद्योग समुहाने व्यक्त केली आहे.

'ईटीव्ही'च्या रौप्यमहोत्सव प्रसंगी काही प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्यांनी दिल्या शुभेच्छा

भारतीय टीव्ही उद्योगात क्रांती घडवून आणण्याचे आणि एक २४ तास चालणारे चॅनल सुरू करण्याचे संपूर्ण श्रेय हे रामोजी राव यांना जाते. ते माझ्यासाठी आदर्श असून पितातुल्य आहे. ईटीव्हीच्या प्रगती मागे रामोजी राव यांचे प्रयत्न, चिकाटी आणि समर्पण आहे. ते सदैव तेलुगू लोकांचे आदरणीय असतील. मी ईटीव्हीच्या पहिल्या आणि २० साव्या वर्धापनदिनाचा भाग होतो. आणि आता पंचवीसाव्या वर्धापण दिनाचा भाग झालो. याचा मला अभिमान आहे. अशी भावना अभिनेता चिरंजीवी यांनी व्यक्त केली आहे.

१९९५-९६ साली मी ईटीव्हीवर आपले आवडते कार्यक्रम पहाण्यासाठी आवर्जून चॅनलचे वेळापत्रक पहायचो. चॅनलवर पादुथा तियागा हा माझा आवडता कार्यक्रम होता. त्याकाळी चित्रपटातील गाणे सहज पहायला मिळत नसे. त्यामुळे, मी चॅनलवरील सर्व गायन कार्यक्रम आवर्जून पहायचो. तसेच, ईटीव्ही न्यूज देखील बघायचो. हे चॅनल आजही प्रसिद्ध असल्याचे अभिनेता नागार्जुन म्हणाले.

यावेळी कार्यक्रमला, ईटीव्ही चॅनल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी बापिनाडू, विभागीय प्रमुख, रामोजी फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक राम मोहन राव आणि विजयेश्वरी, ईनाडूचे व्यवस्थापकीय संचालक किरण, मार्गदर्शीचे व्यवस्थापकीय संचाल शैलजा किरण, रामोजी राव कुटुंबातील सदस्य, सहारी राचेस, सोहना विनय, बृहती आणि सुजय उपस्थित होते. तसेच, ईटीव्ही नेटवर्कचे मुख्य निर्माता पी.के मानवी, मुख्य निर्माता अजय संथी, सचिव जी. श्रीनिवास, ईनाडूचे संचालक आय. वेंकट आणि समुहाचे व्यावस्थापकीय अध्यक्ष गोपाला राव उपस्थित होते.

Last Updated : Aug 28, 2020, 9:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.