ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, जाणून घ्या एका क्लिकवर...

author img

By

Published : Jun 7, 2020, 11:09 AM IST

सकाळी 11 वाजेपर्यंतच्या ठळक घडामोडी...

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

मुंबई - मुंबईमध्ये गॅस गळतीमुळे दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. गॅस गळतीचे उगमस्थान शोधण्यास अग्नीशमन दलाला अपयश आले आहे. केरळ येथील गर्भवती हत्तीच्या घटनेनंतर कुत्र्याला दोरीने बांधून दुचाकीने फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत समोर आला आहे. तर गाझियाबादच्या खोडा गावातील गर्भवती महिलेला नोएडामध्ये वैद्यकीय उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. यासह देशभरातील टॉप-१० घडामोडी वाचा...

  • मुंबई - गॅस गळतीच्या तक्रारीनुसार मुंबईच्या अग्निशमन दलाने यूएस विटामिन, गोवंडी तसेच पंत नगर पोलीस ठाणे परिसरात शोध घेतला पण, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गॅस गळती आढळून आली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. यामुळे यंदाही गॅस गळतीचा उगम शोधण्यात अग्निशमन दलाला अपयश आले आहे. सविस्तर वाचा
  • औरंगाबाद - केरळ येथील गर्भवती हत्तीच्या घटनेनंतर कुत्र्याला दोरीने बांधून दुचाकीने फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानुसार दोघांंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा
  • नोएडा (दिल्ली) - गाझियाबादच्या खोडा गावातील गर्भवती महिलेला नोएडामध्ये वैद्यकीय उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने शनिवारी दिले. महिलेला रुग्णवाहिकेतून नोएडा येथे आणण्यात आल्याचे सांगितले. मात्र, येथील सरकारी किंवा खासगी कोणत्याही रुग्णालयाने तिला दाखल करून घेतले नाही. त्यामुळे उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला, असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. सविस्तर वाचा
  • तिरुअनंतपुरम - तब्बल 75 दिवसांनंतर केरळमधील शबरीमला मंदिर 14 जूनला अय्यप्पा भक्तांसाठी खुले होणार आहे. येथे केवळ रांगेद्वारे दर्शन घेण्यास परवानगी दिली जाईल. तसेच, सध्याच्या कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल. हे मंदिर ‘मिधुनमासा पूजा’ (मल्याळम दिनदर्शिकेत मिधुनम महिन्यातील मासिक पूजा) आणि मंदिर उत्सवासाठी उघडले जाणार आहे. सविस्तर वाचा
  • भुवनेश्वर (ओडिशा) - चेन्नईहून ओडिशातल्या गंजम जिल्ह्यात परतलेल्या मजुराला दोन दिवस जंगलात वास्तव्यास रहावे लागल्याचा प्रकार घडला आहे. गावातील सरपंच आणि इतर गावकऱ्यांनी त्याला गावात घेण्यास आणि क्वारंटाईन करून घेण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर बारिक नायक या व्यक्तीवर अन्न पाण्याशिवाय जंगलात राहण्याची वेळ आली. सविस्तर वाचा
  • मुंबई - ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत येत्या सोमवारपासून (8 जून) मुंबईच्या बेस्ट बसमध्ये आता सामान्य नागरिकांनाही प्रवासाची मुभा असणार आहे. बेस्ट प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने व मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर वाचा
  • नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 9 हजार 971 कोरोनाबाधित आढळले असून 287 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांच्यापेक्षा अधिक झाला आहे. तर महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. सविस्तर वाचा
  • श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाच्या जवानांची मोहीम सुरू आहे. आज सकाळपासून (रविवार) दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्याच्या रेबेन परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरू झाली आहे. यात जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केल्याचे समजते. सविस्तर वाचा
  • अहमदाबाद - 19 जूनला होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकांपूर्वीच गुजरातमधील काँग्रेसच्या तीन आमदारांनी राजीनामे दिले. यानंतर काँग्रेस पक्ष सावध झाला असून त्यांनी शनिवारी त्यांच्या अनेक आमदारांना संबंधित विधानसभा मतदारसंघांच्या नजिकच्या रिसॉर्ट आणि बंगल्यांमध्ये हलविले आहे. त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचू नये, यासाठी पक्षाकडून खबरदारी घेतली जात आहे. पक्षाच्या एका नेत्याने ही माहिती दिली. सविस्तर वाचा
  • बिजापूर (छत्तीसगड) - येथील एका नक्षलवादी जोडप्याने शनिवारी सीआरपीएफ पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. गोपी आणि त्यांची पत्नी भारती अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी अनुक्रमे 5 लाख आणि 2 लाख रुपये असे इनाम जाहीर केेले होते. मात्र, त्यांनी शनिवारी सीआरपीएफच्या पोलीस उप महानिरीक्षक कोमल सिंह आणि अधीक्षक कमलोचन कश्यप यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. दोघा पती पत्नीने शरणागती पत्करल्यावर पोलिसांनी त्यांनी प्रोत्साहनपर प्रत्येकी 10 हजार रुपये दिले. सविस्तर वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.