ETV Bharat / bharat

Top १० @११ PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... - mumbai news today

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

etv bharat top 10 stories at 11 pm
Top १० @ ११ AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...
author img

By

Published : Jun 13, 2020, 1:19 PM IST

Updated : Jun 13, 2020, 11:01 PM IST

मुंबई - शहरात कोरोनाचे नवे 1 हजार 383 रुग्ण आढळून आले असून 69 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 56 हजार 740 वर तर मृतांचा आकडा 2 हजार 111 वर पोहचला आहे. मुंबईमधून आतापार्यंत 25 हजार 947 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने मुंबईत सध्या 28 हजार 682 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

सविस्तर वाचा - मुंबईत 1383 नवे कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या दुपटीचा वेग मंदावला

मुंबई - राज्यात आज १,५५० रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ३४६ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३,४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५१ हजार ३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

सविस्तर वाचा - CoronaVirus : शनिवारी महाराष्ट्रात ३,४२७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, ११३ मृत्यू

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशाची आर्थिक पिछेहाट झाली आहे. अर्थव्यवस्था कमकुवत झाली असून सरकारकडून अर्थव्यवस्था सावरण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान राहुल गांधी यांनी सरकारला अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून इशारा दिला आहे. 'जर सरकारने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पैसे बाजारात सोडले नाही तर गरीबांचा जीव जाईल, मध्यमवर्ग हा नवा गरीब झालेला असेल आणि भांडवलदार देशाला विकत घेतील, असा इशारा राहुल गांधी यांनी ट्विटरवरून दिला आहे.

सविस्तर वाचा - '.. तर गरीबाचा जीव जाईल अन् मध्यमवर्ग हा नवा गरीब असेल'

उदयपूर - दारूच्या आहारी गेलेल्या राजस्थानमधील एका तळीरामाने पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. दारू पिण्यासाठी पैसे नव्हते म्हणून या तळीरामाने चक्क पत्नीची मित्राकडे विक्री केली. पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सविस्तर वाचा - धक्कादायक..! राजस्थानात दारूसाठी तळीरामाकडून पत्नीची विक्री

नाशिक - कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गेल्या तीन महिन्यांपासून सलून (केशकर्तनालय) व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. व्यवसाय बंद असल्यामुळे नाभिक समाज अडचणीत आला आहे. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने जवळपास सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे मात्र, सलून सुरू करण्यास अद्याप परवानगी मिळाली नाही.

सविस्तर वाचा - केंद्राने परवानगी दिल्यास सलून व्यवसाय सुरू करण्याची राज्य शासनाची तयारी - छगन भुजबळ

मुंबई - कोकणात हर्णे, मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, मराठवाड्यात औरंगाबाद, विदर्भात गोंदियापर्यंत आज नैऋत्य मोसमी पावसाची घोडदौड सुरू झाली आहे. येत्या २४ तासात महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मोसमी पाऊस सक्रिय होईल. आजच्या नोंदीनुसार, रत्नागिरीत एक ते दोन ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे.

सविस्तर वाचा - मान्सून अपडेट: येत्या 4 ते 5 दिवसात 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता

ठाणे - कोरोना प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात मागचे शैक्षणिक वर्ष सरले आणि नवीन सुरूही झाले. मात्र, शाळा नियमित सुरू करण्याबाबत अनिश्चिता आहे. अशा परिस्थितीत शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने ऑनलाईन अध्यापनाचा पर्याय निवडला आहे. हा निर्णय स्तुत्य आहे मात्र, सुविधांच्या अभावामुळे ग्रामीण भागातील १ कोटी ६६ विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी याबाबत माहिती दिली.

सविस्तर वाचा - ऑनलाईन शिक्षणात १ कोटी ६६ लाख विद्यार्थी नॉट रिचेबल राहण्याची भीती

कराची - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. आफ्रिदीने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. गुरुवारपासून प्रकृती ठीक नसल्याचे त्याने सांगितले आहे. कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला असून या व्हायरसचा शिरकाव क्रीडाविश्वातही झाला आहे.

सविस्तर वाचा - शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण, ट्विटरद्वारे दिली माहिती

चेन्नई - ‘मेरा वचन ही है शासन’ म्हणणाऱ्या बाहुबली फेम दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्रीच्या गाडीत 100 बाटल्या दारू सापडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दारू विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. या परिस्थितीत शुक्रवारी रात्री अभिनेत्री रम्या कृष्णन हिच्या गाडीमधून 100 हून अधिक दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा - राजमाता 'शिवगामी' फेम अभिनेत्रीच्या गाडीत सापडल्या दारूच्या १०० बाटल्या, गुन्हा दाखल

मुंबई - राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना अभिनेत्री दिशा पाटनीने ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिशाच्या शुभेच्छा ट्विटला नेटकऱ्यांनी गमतीशीर उत्तरे दिली आहेत. यातील काहींनी तर तिला वहिनी म्हणत रीट्विट केले आहे. विशेष म्हणजे आज दिशा पाटनीचा देखील २८ वा वाढदिवस आहे.

सविस्तर वाचा - दिशा पाटनीने बिर्थडे बॉय आदित्यला ट्विटवर दिल्या शुभेच्छा; नेटकऱ्यांची रंगली मजेशीर चर्चा

Last Updated : Jun 13, 2020, 11:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.