ETV Bharat / bharat

Top १० @ ९ AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर... - Coronavirus global updates

सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

etv bharat top 10 news at 9am
Top १० @ ९ AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर...
author img

By

Published : Jun 14, 2020, 9:05 AM IST

मुंबई - विलेपार्ले अग्निशमन केंद्रातील एका जवानाचा सेव्हन हिल रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे... आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रायगड जिल्ह्याला भेट देणार होते. मात्र, हा दौरा आता रद्द करण्यात आला आहे... चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांच्यासह महिला क्रिकेटपटू स्मृती मानधाना आणि दिप्ती शर्मा यांना थांबण्याच्या ठावठिकाणाची माहिती न पुरविल्यामुळे राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीतर्फे (नाडा) नोटीस बजावण्यात आली, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...

  • मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना औषध फवारणी आणि निर्जंतुकीकरणाचे काम अग्निशमन दलाकडून केले जात आहे. यामुळे अग्निशमन दलातील 91 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विलेपार्ले अग्निशमन केंद्रातील एका जवानाचा सेव्हन हिल रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे अग्निशमन दलातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा आठवर पोहोचला आहे.

सविस्तर वाचा - आठवा बळी... कोरोनामुळे मुंबई अग्निशमन दलातील आणखी एका जवानाचा मृत्यू

  • पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात अंतिम वर्षाच्या परीक्षेसंबंधीच्या भूमिकेमध्ये विसंगती आहेत. यावर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मत व्यक्त केले. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत, या मताचा मी आहे. पण, तातडीने परीक्षा घ्याव्यात या मताचा नाही, असे ते म्हणाले.

सविस्तर वाचा - अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत पण... वाचा काय म्हणाले केंद्रीय मंत्री रामदास आठवले

  • मुंबई : रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रायगड जिल्ह्याला भेट देणार होते. मात्र, हा दौरा आता रद्द करण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळामुळे प्रशासन हे पंचनामे व इतर मदत कार्यात व्यस्त आहे. आपदग्रस्तांना अनुदान वाटप, साहित्य वाटप यापूर्वीच सुरू झाले आहे. हे मदत कार्य अधिक वेगाने होणे महत्त्वाचे असल्याने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

सविस्तर वाचा - मुख्यमंत्र्यांचा रायगड दौरा रद्द; प्रशासनाचे मदत कार्य वेगाने होण्यासाठी निर्णय..

  • हैदराबाद : कोरोना महामारी, आणि भारत-चीन सीमेवरील तणाव पाहता, जनतेमध्ये चीनविरोधाची लाट पसरली आहे. समाजमाध्यमांमध्ये चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत. मात्र, आपण खरंच चिनी वस्तूंपासून वेगळे होऊ शकतो का..?

सविस्तर वाचा - चिनी वस्तूंचा वापर टाळणे खरंच शक्य आहे का?

  • नवी दिल्ली - कोरोनामुळे देशाची आर्थिक पिछेहाट झाली आहे. अर्थव्यवस्था कमकुवत झाली असून सरकारकडून अर्थव्यवस्था सावरण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान राहुल गांधी यांनी सरकारला अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून इशारा दिला आहे. 'जर सरकारने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पैसे बाजारात सोडले नाही तर गरीबांचा जीव जाईल, मध्यमवर्ग हा नवा गरीब झालेला असेल आणि भांडवलदार देशाला विकत घेतील, असा इशारा राहुल गांधी यांनी ट्विटरवरून दिला आहे.

सविस्तर वाचा - '.. तर गरीबाचा जीव जाईल अन् मध्यमवर्ग हा नवा गरीब असेल'

  • मुंबई - चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांच्यासह महिला क्रिकेटपटू स्मृती मानधाना आणि दिप्ती शर्मा यांना थांबण्याच्या ठावठिकाणाची माहिती न पुरविल्यामुळे राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीतर्फे (नाडा) नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, बीसीसीआयने उशीर होण्यासाठी 'पासवर्डमध्ये गडबड' झाल्याचा हवाला दिला आहे.

सविस्तर वाचा - डोपिंगविरोधी 'नाडा'ची पुजारा, स्मृती मानधानासह ५ क्रिकेटपटूंना नोटीस

  • मुंबई - राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना अभिनेत्री दिशा पाटनीने ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिशाच्या शुभेच्छा ट्विटला नेटकऱ्यांनी गमतीशीर उत्तरे दिली आहेत. यातील काहींनी तर तिला वहिनी म्हणत रीट्विट केले आहे. विशेष म्हणजे आज दिशा पाटनीचा देखील २८ वा वाढदिवस आहे.

सविस्तर वाचा - दिशा पाटनीने बिर्थडे बॉय आदित्यला ट्विटवर दिल्या शुभेच्छा; नेटकऱ्यांची रंगली मजेशीर चर्चा

  • मुंबई - राज्यात आज १,५५० रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ३४६ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३,४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५१ हजार ३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

सविस्तर वाचा - CoronaVirus : शनिवारी महाराष्ट्रात ३,४२७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, ११३ मृत्यू

  • मुंबई - शहरात कोरोनाचे नवे 1 हजार 383 रुग्ण आढळून आले असून 69 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 56 हजार 740 वर तर मृतांचा आकडा 2 हजार 111 वर पोहचला आहे. मुंबईमधून आतापार्यंत 25 हजार 947 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने मुंबईत सध्या 28 हजार 682 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

सविस्तर वाचा - मुंबईत 1383 नवे कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या दुपटीचा वेग मंदावला

  • पुणे - गेल्या आठवड्यात पिंपळे सौदागर येथे प्रेम प्रकरणातून विराज विलास जगताप या वीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सहा आरोपी अटकेत आहेत. मात्र, या प्रकरणातील मुलीलादेखील आरोपी करण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

सविस्तर वाचा - 'विराज'च्या हत्येप्रकरणी संबंधित मुलीलाही आरोपी करावं; केंद्रीय मंत्र्यांची मागणी..

देशभरातील कोरोना अपडेट : देशभरातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.