ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

वाचा रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

etv bharat top 10 news at 11 pm
ईटीव्ही भारत रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या
author img

By

Published : Jun 25, 2020, 1:12 PM IST

Updated : Jun 25, 2020, 10:56 PM IST

चेन्नई – राज्य सरकारांना कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यास मदत करण्यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाणा राज्याचा दौरा करणार आहे... बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने तब्बल 83 जणांचा जीव गेला आहे... गलवान व्हॅली भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धुमश्चक्री झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे... देशभरात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन या वर्षांच्या अखेरपर्यंत आयआयटी मुंबईत वर्गातील प्रत्यक्ष शिकवण्या होणार नाहीत, असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे... यासह जगातील, देशातील आणि राज्यातील इतर महत्वाच्या टॉप 10 बातम्या वाचा...

  • पाटना - उत्तर भारतामध्ये आज(गुरुवार) ढगांच्या गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने तब्बल 83 जणांचा जीव गेला आहे. तर उत्तरप्रदेश राज्यात 25 जण दगावले आहेत. बिहारमधील गोपालगंज या एकाच जिल्ह्यात 13 जण वज्रघाताचे शिकार झाले आहेत. देशावर कोरोना संकट असतानाच नैसर्गिक संकटानेही उत्तर भारतावर शोककळा पसरली आहे

सविस्तर वाचा - बिहारमध्ये वीज कोसळून 83 जणांचा मृत्यू, उत्तरप्रदेशात 25 दगावले..

  • नवी दिल्ली - गलवान व्हॅली भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धुमश्चक्री झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तणाव निवळण्यासाठी 22 जूनला वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर चीनचे सैन्य आणि वाहनांचा ताफा काही प्रमाणात सीमेवरून मागे घेतला आहे. सीमेवर चीनने मोठ्या प्रमाणात वाहनेही आणून ठेवली होती. मात्र, ती आता मागे घेण्यात आली आहे.

सविस्तर वाचा - गलवान व्हॅलीतून चीनचे काही सैन्य आणि वाहनांचा ताफा मागे सरकला

  • नवी दिल्ली - राज्य सरकारांना कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यास मदत करण्यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाणा राज्याचा दौरा करणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल या पथकाचे नेतृत्त्व करणार आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा या पथकाकडून घेण्यात येणार असून राज्यांना उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा - कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक 'या' राज्यांना देणार भेटी

  • मुंबई - आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय आज (गुरुवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. आशा स्वयंसेविकांना दरमहा कमाल 2 हजार रुपयापर्यंत, तर गट प्रवर्तकांना 3 हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येतील. यासाठी 170 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. 1 जुलैपासून ही वाढ लागू होईल. सध्या राज्यात ग्रामीण आणि नागरी भागात 65 हजार 740 आशा स्वयंसेविकांची पदे भरलेली आहेत.

सविस्तर वाचा - आशा सेविकांच्या मानधनात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीतील इतरही महत्त्वाचे निर्णय पाहा...

  • मुंबई - देशभरात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन या वर्षांच्या अखेरपर्यंत आयआयटी मुंबईत वर्गातील प्रत्यक्ष शिकवण्या होणार नाहीत, असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीची माहिती आयआयटी मुंबईचे संचालक सुभाशिष चौधरी यांनी सोशल माध्यमावर एक पोस्ट शेअर करुन दिली आहे.

सविस्तर वाचा - कोरोनाचा धसका; आयआयटी मुंबईत वर्षेअखेरपर्यंत प्रत्यक्ष शिकवण्या बंद

  • मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंच यांनी त्यांचे मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रीया ताबडतोब पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी 111 कोटी रुपये इतकी रक्कम वितरीत केली आहेत.

सविस्तर वाचा - 'मानधन न मिळालेल्या सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी'

  • मुंबई - लॉकडाऊनमुळे बंद असलेला सलून व्यवसाय अखेर महाराष्ट्रात पुन्हा सुरू होणार आहे. राज्य सरकारने येत्या रविवारपासून म्हणजे २८ जूनपासून सलून आणि जीम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. जिम आणि सलून या आठवड्यात सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. केश कर्तनालय सुरू करताना सरकारने निर्बंध लावले असून तूर्तास मास्क घालून फक्त कटिंग करता येणार आहे, दाढी करता येणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

सविस्तर वाचा - कटिंगला संधी मात्र दाढीवर बंदी; राज्यात सलून, जिम होणार सुरू

  • मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येने अजून लोक सावरलेले नाहीत तोवर टिकटॉक स्टार सिया कक्कड हिने आत्महत्या केल्याची बातमी आली आहे. केवळ १६ वर्ष वय असलेल्या सियाने आपले जीवन संपवले. तिच्या मृत्यूमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सविस्तर वाचा - टिकटॉक स्टार सिया कक्कडची आत्महत्या, चाहत्यांना धक्का

  • पालघर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या लोकांना लुबाडण्याचे प्रकार उघड होत आहेत. नालासोपारा येथे एका व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याची परवड थांबलेली नाही. रुग्णवाहिकेची कोरोना महामारीत सुरू असलेली लूट आणि कुटुंबीयांकडे पैशाची असलेली कमतरता पाहता मृतदेहाला थेट एका टॅक्सीच्या टपावर तिरडी बांधून स्मशानभूमीत आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. ही हृदयाला पिळवटून टाकणारी घटना नालासोपारा पूर्व येथे घडली.

सविस्तर वाचा - कोरोना इफेक्ट : नालासोपाऱ्यात टॅक्सीच्या टपावरून अंत्ययात्रा

  • कोल्हापूर - शहराची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी महापालिकेची परिवहन सेवा अर्थात केएमटी सध्या प्रचंड तोट्यात आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून परिवहन सेवा पूर्णपणे बंद आहे. सर्व बाजूंनी केएमटीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या शहरात काही बसच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रवासीच मिळत नसल्याने केएमटी आणखीनच तोट्यात जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सविस्तर वाचा - ईटीव्ही भारत विशेष : कोल्हापूरची लाइफलाइन 'केएमटी' रस्त्यावर, प्रवासी न मिळल्याने 9 कोटींचा फटका

Last Updated : Jun 25, 2020, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.