हैदराबाद - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. याशिवाय निसर्ग चक्रीवादळ ३ जूनला महाराष्ट्रातील किनाऱ्यावर धडकणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. तसेच चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सजग असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. वाचा देशभरासह राज्यातील टॉप-१० घडामोडी...
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील दक्षिणेकडील अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांच्या दरम्यान सुरु असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.
वाचा सविस्तर... जम्मू-काश्मीर : जवानांनी एका दहशतवाद्याला घातले कंठस्नान, चकमक सुरू
गुवाहाटी - आसाममधील पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. मात्र, या मान्सूनपूर्व पुराच्या तडाख्यात गेल्या आठवड्यापासून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
वाचा सविस्तर...आसाममध्ये पुरामुळे 3 लाख लोक बाधित, 9 जण ठार
मुंबई - निसर्ग चक्रीवादळ ३ जूनला महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावर धडकणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे निसर्ग वादळाचा तडाखा बसून हानी होऊ नये, याचे नियोजन सरकार करत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.
वाचा सविस्तर... 'निसर्ग' चक्रीवादळ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गृहमंत्री अमित शाहांशी व्हिडिओ कॉन्फरन्सने चर्चा
मुंबई - अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सजग आहे. कोकण किनारपट्टीवर एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन पूर्वतयारी केली जात आहे. समुद्रात गेलेल्या सर्व बोटी बंदरात परत बोलावून घेतल्या आहेत, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून दिली.
वाचा सविस्तर...चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सजग - महसूलमंत्री
मुंबई - महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर ३ जूनला निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून सर्व उपाययोजना समन्वयाने करण्यात येत आहेत. मुंबईकर नागरिकांनी देखील आवश्यक ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे.
वाचा सविस्तर... निसर्ग चक्रीवादळ : सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, महापालिका आयुक्तांचे आवाहन
मुंबई - मुझप्फरपूर येथील रेल्वे स्थानकात मृत आईला उठवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेबाबत सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान भावूक झाला. आई गमावल्याचे दु:ख समजू शकतो, असे म्हणत शाहरुख खानने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
वाचा सविस्तर... मृत आईला चिमुकला उठवतानाचा व्हिडिओ पाहून शाहरुख झाला भावूक; म्हणाला. . .
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत अजूनही अनेक कामगार अडकलेले आहेत. या कामगारांच्या मदतीला अभिनेत्री स्वरा भास्कर पुढे सरसावली आहे. स्वरा भास्करने आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या मदतीने अनेक कामगारांना घरी पाठवण्यास मदत केली आहे.
वाचा सविस्तर...दिल्लीत अडकलेल्या कामगारांच्या मदतीला धावली स्वरा भास्कर; बिहारी नागरिकांना पाठवले घरी
हैदराबाद - जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले असून जगभरातील 63 लाख 65 हजार 173 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. 3 लाख 77 हजार 397 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून जगभरातील 29 लाख 3 हजार 382 नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत.
वाचा सविस्तर... जगभरात 63 लाखांहून अधिक कोरोनाबाधित
नवी दिल्ली - कोरोनाबाधित रुग्णाने निराशेतून पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नवी दिल्लीतील बत्रा रुग्णालयात घडली. ६३ वर्षीय रुग्णाला २० मे रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
वाचा सविस्तर... धक्कादायक ; कोरोनाबाधिताची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या
इस्लामाबाद - भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी यांनी सोशल मीडियावरील वाक् युद्ध संपवून शांत राहावे, असा सल्ला पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक वकार युनूस यांनी दिला आहे.
वाचा सविस्तर... गंभीर आणि आफ्रिदीने वाक् युद्ध संपवून शांत राहावे, वकार मास्तरांचा सल्ला