जयपूर - सत्तास्थापेनेचा पेच अजूनही कायम आहे. राज्यासह राजधानी दिल्लीतही बैठकांचा सपाटा सुरूच आहे. मात्र, सध्यातरी काहीच स्पष्ट झालेले दिसत नाही. फोडाफोडीच्या राजकारणापासून सावध पवित्रा घेत काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना राजस्थानमधील जयपूर येथील रिसोर्टमध्ये ठेवण्यात आले होते. आज(बुधवार) हे सर्व आमदार जयपूरवरून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
हेही वाचा - ...तर कुणी माईचा लाल निवडून येणार नाही - अजित पवार
मागील 5 दिवसांपासून काँग्रेसचे सर्व आमदार हे जयपूरमध्ये होते. सत्तास्थापनेच्या विषयांवरुन राज्यासह दिल्लीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी या आमदारांसोबत अनेक बैठका केल्या. पाठिंबा देण्याबाबतही अनेक खलबते जयपूरमध्ये पहायला मिळाले आहेत. पाच दिवसांनंतर हे सर्व आमदार मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत बातचीत केलीये आमचे जयपूरचे प्रतिनिधी अजित शेखावत यांनी...