मुंबई - जगातील कोरोना रुग्णांचा आकडा 70 लाख 80 हजारावर पोहोचला आहे...'मिशन बिगिन अगेन'अंतर्गत राज्य शासनाने व मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार आजपासून (दि. 8 जून) मुंबईच्या बेस्ट बसमध्ये आता सामान्य नागरिकांनाही प्रवासाची मुभा देण्यात आली आहे... भारतातील प्रमुख मोठ्या देवस्थानांपैकी एक असलेले बालाजी मंदिर पुन्हा भक्तांना दर्शनासाठी उघडण्यात आले आहे. यासह अकरा वाजेपर्यंतच्या मोठ्या बातम्या, वाचा सविस्तर...
- हैदराबाद - कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. जगभरामध्ये आतापर्यंत 70 लाख 80 हजार 811 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 4 लाख 5 हजार 74 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 34 लाख 55 हजार 104 जण कोरोनामुक्त झाले आहेत. न्यूझीलंड हा देश कोरोनामुक्त झाल्याची माहिती तेथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.
सविस्तर वाचा - Global COVID-19 Tracker: जगभरात कोरोनाबधितांची संख्या 70 लाखांवर तर न्यूझीलंड झाले कोरोनामुक्त
- मुंबई - 'मिशन बिगिन अगेन'अंतर्गत राज्य शासनाने व मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार आजपासून (दि. 8 जून) मुंबईच्या बेस्ट बसमध्ये आता सामान्य नागरिकांनाही प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. बेस्ट प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गोरेगाव बस डेपोतून ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा.
सविस्तर वाचा - आजपासून सामान्य प्रवाशांसाठी 'बेस्ट' बससेवा सुरु, मुंबईकरांना दिलासा
- तिरुमला - भारतातील प्रमुख मोठ्या देवस्थानांपैकी एक असलेले बालाजी मंदिर पुन्हा भक्तांना दर्शनासाठी उघडण्यात आले आहे. मागील ७० दिवसाहून अधिक काळानंतर हे मंदिर भक्तासाठी खुले करण्यात आले आहे. पण भक्तांना दर्शनासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहेत.
सविस्तर वाचा - भक्तांसाठी तिरुपती बालाजी मंदिर उघडले, दर्शनासाठी 'या' आहेत अटी
- अलवर - देशात सध्या कोरोना महामारी वेगाने पसरत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या पार्दुभावापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सर्वच स्तरातून करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने फिजिकल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थानच्या अलवर येथील एका १५ वर्षीय मुलाने फिजिकल डिस्टन्सिंग ठेवता येईल अशी एक टोपी आणि हात धुण्याची निर्धारित वेळ सांगणार रोबोट तयार केला आहे.
सविस्तर वाचा - कोरोनाशी लढा... फिजिकल डिस्टेन्सिंग ठेवायला सांगतोय अलवरच्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा रोबो
- श्रीनगर - शोपीयानमधील पिंजोरा गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक उडाली. यात 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. या बाबतची माहिती जम्मू कश्मीर पोलीसांनी दिली आहे.
सविस्तर वाचा - जम्मू-काश्मीर; शोपीयानमध्ये सुरक्षा दलाने केला 4 दहशतवाद्यांचा खात्मा
- भोपाळ- मध्य प्रदेशातील बहुजन समाज पार्टीचे नेते मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. शिवपुरी मधील करेरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले प्रागी लाल जाटव यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
सविस्तर वाचा - मध्य प्रदेशातील बसपाचे नेते मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये दाखल
- जयपूर (राजस्थान) - प्रवचनकार मुरारी बापू यांच्या विरोधात श्रीकृष्णाबाबत अपशब्द वापरल्यामुळे कालवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर यांच्या एका प्रवचनाचा व्हिडिओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी श्रीकृष्ण त्यांचे वडीलबंधू बलदेवांवर टीका केली होती.
सविस्तर वाचा - श्रीकृष्णाबाबत अपशब्द वापरणाऱ्या प्रवचनकार मुरारी बापूंविरोधात गुन्हा दाखल
- मुंबई - लॉकडाऊनच्या काळात सर्व खेळाडू आपापल्या घरी कुटूंबियासोबत वेळ घालवत आहेत. अशात अनेक खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. रोहित शर्माही या काळात सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. त्याने काही तासांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो मुलगी समायरासोबत खेळताना दिसत आहे.
सविस्तर वाचा - Video : लॉकडाऊनमध्ये लाडक्या समायरासोबत रोहित शर्माची धमाल मस्ती
- गोंदिया - सालेकसा तालुक्यातील साखरी-टोला गावातील दोन मैत्रिणीने विहिरीत उडी मारल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीला वाचविण्यात यश आले आहे. शनिवारी रात्री घरी उशिरा आल्यानंतर घरच्यांनी रागवले म्हणून एकीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तर दुसरीने तिच्या आत्महत्येला मला दोषी ठरवतील, या भीतीने तिनेही विहिरीत उडी मारली. मात्र, ग्रामस्थांनी तिचा जीव वाचवला आहे. या दोन्ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडल्या आहेत. रोशनी सुखराम चित्रीव (वय 17) असे मृत मुलीचे नाव आहे. तर शुभांगीनी देवचंद बिसेन (वय 17) असे बचावलेल्या तिच्या मैत्रिणींचे नाव आहे.
सविस्तर वाचा - घरचे रागावले म्हणून दोघी मैत्रिणींनी मारली विहिरीत उडी, एक बचावली
- चंद्रपूर - पोहायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना पोंभुर्णा तालुक्यातील भटारी या गावात घडली. कार्तिक मारोती कोवे असे मृत मुलाचे नाव आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
सविस्तर वाचा - पोहायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू; पोंभुर्णा येथील घटना