ETV Bharat / bharat

जागतिक निर्वासित दिन : जाणून घ्या प्रत्येक मिनिटाला जगामध्ये किती लोक निर्वासित होतात...

author img

By

Published : Jun 20, 2020, 8:30 AM IST

Updated : Jun 20, 2020, 9:15 AM IST

निर्वासित दिनानिमित्त जगभरातील निर्वासितांच्या समस्या ओळखून, त्यांच्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत जनजागृती करण्यात येते. जागतिक शरणार्थींचे हक्क, त्यांच्या गरजा आणि त्यांच्या आकांक्षांवर प्रकाश टाकण्यासाठी, राजकीय इच्छाशक्ती आणि संसाधने एकत्रित करण्यासाठी जागतिक स्तरावर जागृती आणि कार्य होणे गरजेचे आहे. शरणार्थींच्या जीवनाचे संरक्षण आणि सुधारणा करण्यासाठी जागतिक शरणार्थी दिनी आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची मदत होते.

etv bharat special article of World Refugee Day 2020
जागतिक निर्वासित दिन : जाणून घ्या प्रत्येक मिनिटाला जगामध्ये किती लोक निर्वासित होतात...

हैदराबाद - जगभरातील निर्वासितांच्या प्रश्नांबाबत जनजागृती व्हावी यासाठी २० जून हा जागतिक निर्वासित दिन म्हणून पाळला जातो. निर्वासितांच्या संयुक्त राष्ट्र उच्चायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरात सुमारे सत्तर दशलक्ष लोक हे निर्वासित आहेत. हे लोक युद्ध, दहशतवाद, छळवणूक किंवा इतर संकटांपासून वाचण्यासाठी आपले घरदार सोडून निघतात, आणि देशोधडीला लागतात. विशेष म्हणजे, २०१८ मध्ये झालेल्या नोंदीनुसार वर्षभरात प्रत्येक मिनिटाला २५ लोक निर्वासित झाले होते.

निर्वासित दिनानिमित्त जगभरातील निर्वासितांच्या समस्या ओळखून, त्यांच्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत जनजागृती करण्यात येते. जागतिक शरणार्थींचे हक्क, त्यांच्या गरजा आणि त्यांच्या आकांक्षांवर प्रकाश टाकण्यासाठी, राजकीय इच्छाशक्ती आणि संसाधने एकत्रित करण्यासाठी जागतिक स्तरावर जागृती आणि कार्य होणे गरजेचे आहे. शरणार्थींच्या जीवनाचे संरक्षण आणि सुधारणा करण्यासाठी जागतिक शरणार्थी दिनी आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची मदत होते.

२० जून २००१रोजी पहिला निर्वासित दिन पाळण्यात आला होता. १९५१ च्या निर्वासितांसंबंधी झालेल्या अधिवेशनाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त या दिवसाचे अनावरण करण्यात आले. हा मूळ आफ्रिकन शरणार्थी दिन म्हणून ओळखला जात असे, मात्र २००० च्या डिसेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने याला अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय शरणार्थी दिन म्हणून मान्यता दिली.

प्रत्येक कृती मौल्यवान..

यावर्षी कोरोना महामारी, आणि जगभरात सुरू असलेल्या वर्णद्वेशाविरोधी आंदोलनांमुळे जगभरात समानता किती महत्त्वाची आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. एका अशा जगाची मागणी सगळीकडूनच केली जात आहे, जिथे कोणीही इतरांपेक्षा मागे पडत नाही. यासाठी जगातील प्रत्येक नागरिकाने स्वतः पाऊल उचलणे गरजेचे आहे. यातूनच २०२०च्या निर्वासित दिनाची थीम समोर आली आहे, ती म्हणजे - एव्हरी अ‌ॅक्शन काऊंट्स! म्हणजेच, प्रत्येक व्यक्तीने केलेली छोट्यातील छोटी कृतीदेखील बदल घडवण्यासाठी महत्त्वाची ठरते.

निर्वासितांबाबत तुम्हाला हे माहिती आहे का?

⦁ प्रत्येक मिनिटाला जगातील सुमारे २० लोक निर्वासित होतात.

⦁ जगभरात ७९.५ दशलक्ष लोकांना नाईलाजाने निर्वासित व्हावे लागले आहे. यांमधील सुमारे ३० ते ३४ दशलक्ष निर्वासित हे १८ वर्षांपेक्षा लहान आहेत.

⦁ जगातील एक टक्के लोकसंख्या ही विस्थापित आहे.

⦁ जगातील विस्थापित लोकांपैकी ८०% लोक तीव्र अन्न असुरक्षितता आणि कुपोषणामुळे प्रभावित देशांमध्ये किंवा प्रदेशात आहेत.

⦁ विस्थापित झालेल्यांपैकी ७३% लोक हे त्यांच्या शेजारील देशांमध्ये आहेत

⦁ जगभरातील एकूण विस्थापितांपैकी ६८ टक्के लोक हे केवळ पाच देशांमधील आहेत. यांमध्ये सिरिया, व्हेनेझुएला, अफगाणिस्तान, दक्षिण सुदान आणि म्यानमारचा समावेश आहे.

⦁ ज्या लोकांना कोणत्याही राज्याची ओळख नाही, असे सुमारे ४.२ दशलक्ष लोक जगभरात आहेत.

⦁ ४.२ दशलक्ष लोकांनी विविध देशांमध्ये आश्रयासाठी अर्ज केले आहेत.

⦁ २०१९ मध्ये जवळपास १,०७,८०० लोकांचे जगभरातील २६ देशांमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे.

⦁ जगभरातील ४५.७ दशलक्ष लोक हे त्यांच्या देशामध्येच विस्थापित झाले आहेत.

⦁ जगभरातील विस्थापितांपैकी ७० टक्के लोक हे दारिद्ररेषेखाली आहेत.

भारतातील निर्वासित..

२०१७ मध्ये 'यूएनएचसीआर'ने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, भारतामध्ये सुमारे दोन लाख निर्वासित राहतात. हे निर्वासित म्यानमार, आफगाणिस्तान, सोमालिया, तिबेट, श्रीलंका, पाकिस्तान, पॅलेस्टाईन आणि बर्मासारख्या देशांमधून आलेले आहेत. निर्वासितांना देशात ज्याप्रकारे आश्रय दिला जातो, त्याचे इतर देशांनीही अनुकरण करावे, असेही यूएनएचसीआरने म्हटले आहे.

कोविड-१९ आणि निर्वासित..

कोरोना महामारीमुळे जगातील विस्थापितांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही महामारी नुकतीच सुरू झाली असली, तरी याचे दूरगामी परिणाम फारच भयंकर होणार आहेत. देशांनी आपापल्या सीमा बंद केल्याचा सर्वाधिक फटका निर्वासितांना बसला आहे. सर्व देश कोरोना महामारीवर लक्ष केंद्रीत करत असल्यामुळे, निर्वासितांच्या समस्यांकडे, त्यांच्या नोंदणीकरणारकडे, त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांकडे बऱ्याच अंशी दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

हेही वाचा - हल्ल्याचा कट उधळला.. पाक पुरस्कृत खलिस्तानी चळवळीच्या हस्तकांना पंजाबमधून अटक

हेही वाचा - चीनने भारताच्या भूमीत घुसखोरी केली नाही - पंतप्रधान मोदी

Last Updated : Jun 20, 2020, 9:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.