ETV Bharat / bharat

देशभरातील ठळक घडामोडींवर एक नजर...

नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्यावरून  केंद्र सरकारवर टीका करण्याच्या प्रयत्नात काँग्रेसलाच ट्रोल्सचा सामना करावा लागत आहे.

देशभरातील ठळक घडामोडींवर एक नजर...
देशभरातील ठळक घडामोडींवर एक नजर...
author img

By

Published : Dec 27, 2019, 9:40 PM IST

  • भाजपवर टीका करण्याच्या प्रयत्नात काँग्रेसकडून झाली चूक

नवी दिल्ली - नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका करण्याच्या प्रयत्नात काँग्रेसलाच ट्रोल्सचा सामना करावा लागत आहे. भाजप आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करणारं एक कार्टून काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, त्यामध्ये भारताचा नकाशाच चुकीचा दाखवण्यात आला होता. त्यामुळे नेटकऱ्यांनी काँग्रेसला चांगलेच ट्रोल केले आहे. दरम्यान ट्रोल झाल्यानंतर महिला काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून हे वादग्रस्त ट्वीट गायब झाले आहे.

  • अर्थ मंत्री जयराम ठाकूर यांनी हिमाचल सरकारचे केले कौतुक

नवी दिल्ली - हिमाचलमध्ये भारतीय जनता पक्षाला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अर्थ मंत्री जयराम ठाकूर यांनी शिमलामधील रीज मैदानातील आयोजीत सभेत राज्य सरकारचे भरभरून कौतुक केले. नरेंद्र मोदी यांनी 8 कोटी महिलांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळवून दिला. त्याच प्रकारे हिमाचल सरकारने गृहिणी सुविधा योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना गॅस सिलेंडर प्रदान केल्याचे त्यांनी सांगितले.

  • कोटामधील एका रुग्णालयात 77 बालकांचा मृत्यू, चौकशीप्रकरणी विशेष समितीचे गठन

जयपूर - राज्यातील कोटा जिल्ह्यामध्ये जे.के.लोन रुग्णालयात 1 महिन्यापूर्वी तब्बल 77 बालकांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निर्देशानुसार या प्रकरणी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. संपूर्ण घटनेची चौकशी वैद्यकीय शिक्षण सचिव वैभव गालरिया करणार आहेत.

  • लग्नाला वयाचं बंधन नसतं! केरळमध्ये वृद्ध जोडप्याचा विवाह

त्रिशूर - लग्न करण्यासाठी वयाची कोणतीच मर्यादा नसते हे केरळमधील एका जोडप्याने सत्यामध्ये उतरवले आहे. शहरामधील शासकीय वृद्धाश्रमामधील कोचीयान (67) आणि लक्ष्मी अम्मालू (66) यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वृद्ध दांपत्याच्या लग्नासाठी रामवर्मपुरम वृद्धाश्रमात जोरदार तयारी सुरू असून शनिवारी लग्न होणार आहे.

  • भारतीय लष्कराला मानवधिकार कायद्यांप्रती आदर - बीपिन रावत

नवी दिल्ली - भारतीय लष्कराला मानवधिकार कायद्यांप्रती आदर असून भारतीय लष्कर धर्मनिरपेक्ष असल्याचे लष्कर प्रमुख जनरल बीपिन रावत म्हणाले. राष्ट्रीय मानवधिकार आयोगच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

  • मी जिवंत असे पर्यंत सीएए बंगालमध्ये लागू होणार नाही - ममता बॅनर्जी

कोलकाता - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मी जिवंत असे पर्यंत सीएए कायदा राज्यात लागू होऊ देणार नसल्याचे म्हटले आहे.

  • उत्तर प्रदेश : आंदोलनामध्ये तोडफोड करणाऱ्या 498 जणांची ओळख पटली

वी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनांनी हिंसक वळण घेतले होते. त्यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये लखनौ, मेरठ, रामपूर, मुझफ्फरनगर, फिरोजाबाद, कानपूर आणि बुलंदशहर येथे झालेल्या आंदोलनामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या 498 जणांची ओळख पटल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या माहिती व जनसंपर्क विभागाने दिली.

  • कर्नाटकात विश्व हिंदू परीषदेची बैठक, सीएए, एनआरसी विषयांवर चर्चा

बंगळुरू - कर्नाटकमधील मंगळुरु येथील आयोजित विश्व हिंदू परीषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सीएए, एनआरसी, महिला सुरक्षा आणि राम मंदीर उभारणीविषयी चर्चा झाली.

  • 'सर्वांना सोबत घेतल्याशिवाय देशाची अर्थव्यवस्था चालवली जाऊ शकत नाही'

नवी दिल्ली - काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्यावरून केंद्रसरकारवर हल्लाबोल केला आहे. हे कायदे देशातील गरिबांवरील टॅक्स आहे. देशातील प्रत्येक धर्म-जात, आदिवासी, दलित, मागासवर्गीयांना सोबत घेतल्याशिवाय अर्थव्यवस्था चालवली जाऊ शकत नाही. भारत आणि चीन हे दोन्ही देश सोबत एकाच गतीने प्रगतीपथावर होते. मात्र आता भारतामध्ये हिंसा पाहायला मिळत असून देशातील महिला सुरक्षित नसल्याचे राहुल गांधी म्हणाले.

  • पाकिस्तानचा गोळीबाराला जवानांनाकडून चोख प्रतिउत्युत्तर, पाकिस्तानचे 4 सैनिक ठार

श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याने आपले नापाक इरादे अजूनही सोडलेले नाहीत. काही दिवसांपासून पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये पाकिस्तानचे 4 सैनिक ठार झाले असून त्यांच्या चौक्याही उद्धवस्त झाल्या आहेत.

  • नेपाळमार्गे दहशतवाद्यांची देशात घुसखोरी, हाय अलर्ट जारी

डेहराडून - जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेचे दहशतवादी नेपाळमार्गे भारतीय सीमेवर घुसखोरी करणार असल्याची गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नेपाळ सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • प्रियंका गांधींचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल

नवी दिल्ली - काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी बेरोजगारी मुद्द्यावरून अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते तुम्हाला आधी 2 कोटी रोजगाराचे आश्वासन देतील आणि सत्तेमध्ये आल्यानंतर देशातील विद्यापीठ आणि संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करतील. याविरोधात तुम्ही आंदोलन केल्यावर तुम्हाला मुर्खात काढण्याचा प्रयत्न करतील. मात्र, या देशातील तरुण याविरोधात निडरतेने लढत राहतील, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

  • मनोज तिवारींचे मोदींना पत्र, बलिदान दिनाची तारीख बदलण्याची मागणी

नवी दिल्ली - दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी बालदिनाची तारीख बदलण्याची मागणी करणारं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. पंडित जवारलाल नेहरु यांचा 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो. नेहरु यांच्या जन्मदिनाऐवजी गुरू साहिब श्री गुरुगोविंद सिंह यांचे पुत्र साहिबजादा फतेह सिंह यांच्या बलिदान दिनी देशात बालदिन साजरा केला जावा, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.

  • कारगीलमध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत, इंटरनेट सेवेचा गैरवापर न करण्याचे आवाहन

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. आज तब्बल 145 दिवसानंतर कारगीलमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. इंटरनेट सेवेचा गैरवापर न करण्याचे आवाहन स्थानिक नेत्यांनी केले आहे.

Intro:Body:

ु््ु

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.