ETV Bharat / bharat

'...तर २६ जानेवारीला ट्रॅक्टरसह दिल्लीला कूच करणार'

आज ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांच्याशी संवाद साधला. यावेळी राकेश टिकैत यांनी 32 वर्षांपूर्वीच्या आपल्या वडिलांसोबत केलेल्या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला. सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास 26 जानेवरीला आम्ही ट्रॅक्टरसह दिल्लीत कूच करू आणि तिरंगा फडकवू, असेही ते म्हणाले.

राकेश टिकैत यांच्याशी ईटीव्हीच्या प्रतिनिधींची खास बातचीत

author img

By

Published : Dec 30, 2020, 10:13 AM IST

Updated : Dec 30, 2020, 10:54 AM IST

नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हजारो शेतकऱ्यांनी सीमेवर ठिय्या मांडला आहे. आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला असून आज 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांच्याशी संवाद साधला. यावेळी राकेश टिकैत यांनी 32 वर्षांपूर्वीच्या आपल्या वडिलांसोबत केलेल्या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला.

राकेश टिकैत यांच्याशी ईटीव्हीच्या प्रतिनिधींची खास बातचीत

वडिलांसोबत 32 वर्षांपूर्वी दिल्लीला आलो होतो. ते आंदोलन दिल्लीच्या आतील भागात होते आणि आताचे आंदोलन आम्ही सीमेवर करत आहोत. तेव्हा शेतकऱ्यांच्या मागण्यापुढे सरकार झुकले होते आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांवर विश्वास ठेवला. पण आजचे सरकार त्रास देत आहे. आम्ही संघर्ष करत राहणार आहोत. बुधवारी होणाऱ्या चर्चेत आम्ही आमचे मुद्दे मांडू, असे ते म्हणाले.

सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास 26 जानेवरीला आम्ही ट्रॅक्टरसह दिल्लीत कूच करू आणि तिरंगा फडकवू. 26 जानेवारी रोजी देशभक्त आणि देशद्रोही कोण हे कळेल, असे राकेश टिकैत म्हणाले.

टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी -

शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व राकेश टिकैत करत आहेत. मागील काही दिवसांपासून टिकैत सतत माध्यमांपुढे असतात. टिकैत यांना निनावी नंबरवरून जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील कौशांबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून फोन करणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

सरकार आणि शेतकऱ्यांत आज चर्चा होणार -

कृषी कायद्यांच्या मुद्यावर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात 30 डिसेंबरला म्हणजेच आज चर्चा होणार आहे. यापूर्वी शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. केंद्र सरकार कायद्यात काहीप्रमाणात बदल करण्यास राजी आहे. हे कायदे शेतकरी हिताचे आहेत, अशी भूमिका सरकारकडून मांडण्यात आली आहे.

हेही वाचा - YEAR ENDER 2020 : कोरोना महामारीच्या काळात तीन राज्यात रंगलेले सत्तानाट्य !

Last Updated : Dec 30, 2020, 10:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.