एर्नाकुलम- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात सुरक्षित टॅक्सी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी नवीन सुविधा आणली आहे. फायबर क्लिअर ग्लासचा वापर करुन टॅक्सीतील मागील प्रवाशाच्या आसनातून ड्रायव्हरचे आसन वेगळे करण्याची ही व्यवस्था आहे. जेणेकरून प्रवासादरम्यान प्रवाशी आणि वाहनचालकांचा संपर्क टाळता येईल. यामुळे प्रवास सुरक्षित होणार आहे.
हेही वाचा- बापरे! आर्थर रोड कारागृहात 77 कैदी, 26 कर्मचाऱ्यांसह तब्बल 103 जणांना कोरोनाचा संसर्ग
टॅक्सीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांना सॅनिटायझर हाताला लावणे बंधनकारक असणार आहे. तसेच, ड्रायव्हर आणि प्रवाशांमधील संवादादरम्यान संसर्ग होऊ नये, म्हणून एक पॅनेल लावण्यात आला आहे. ड्रायव्हरशिवाय दोनच व्यक्ती या टॅक्सीमध्ये बसू शकतात. ड्रायव्हरला मास्क आणि ग्लोव्ह्ज घालणे अनिवार्य आहे. तसचे प्रवाशांनाही मास्क घातल्याशिवाय टॅक्सीत बसू दिले जाणार नाही. सुरक्षिततेच्या कारणास्तव टॅक्सीतील एअर कंडिशनरनही बंद असेल.