श्रीनगर- सुरक्षा दलांचे जवान आणि अतिरेक्यांमध्ये जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात चकमक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील डांगेरपोरा भागात शनिवारी पहाटे अतिरेक्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम राबवली होती. या भागात अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहिम राबवल्याचे पोलिसांनी सांगतिले.
याभागात शोधमोहिम सुरु असताना लपलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या जवांनावर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलाकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले. याबाबत अजून अधिक माहिती समोर येण्यासाठी वेळ लागेल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.