नवी दिल्ली - दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या बोईंग ७७७ या एअर इंडियाच्या विमानाला बुधवारी रात्री आग लागली. याच्या ऑक्झिलरी पॉवर युनिटमध्ये (एपीयू) दुरुस्ती सुरू असताना ही आग लागली. या वेळी विमान पूर्ण रिकामे होते. तातडीने ही आग विझवण्यात आली. एअर इंडियाने हा छोटासा अपघात असल्याचे म्हटले आहे.
दिल्ली विमानतळावर ही घटना घडली. विमानातील एसी दुरुस्ती सुरू असताना ही आग लागल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.