ETV Bharat / bharat

दिवाळीपूर्वीच निवडणुका; २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ला मतमोजणी - Election Commission

महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहिर केल्या. महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग
author img

By

Published : Sep 21, 2019, 8:41 AM IST

Updated : Sep 21, 2019, 2:20 PM IST

नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केल्या आहेत. राज्यात २१ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. यासंबधीची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दिली. .

  • २७ सप्टेंबर अर्ज भरण्याची तारीख

  • ४ ऑक्टोबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख

  • ५ ऑक्टोबर अर्ज छाणणी

  • ७ ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याची तारीख

  • २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात होणार मतदान
  • २४ ऑक्टोबरला मतमोजणी
  • विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबरला संपणार
  • २८८ जागांसाठी महाराष्ट्रात होणार निवडणूक
  • महाराष्ट्रात ८ कोटी ९४ लाख मतदार
  • विधानसभेसाठी खर्चाची मर्यादा २८ लाखापर्यंत
  • सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेबरोबर होणार नाही
  • हरियाणात ९० जागांसाठी होणार निवडणूक

महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यामध्ये सर्वच पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. आता तारखा निश्चित झाल्यानंतर निवडणुकांच्या रणधुमाळीला खरी सुरुवात होईल. सर्वच पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सभा आणि भेटींचे आयोजन करण्याचा सपाटा लावला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याआधीच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला होता. त्या बैठकीनंतर त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका दिवाळीअगोदरच घेण्याबाबत सकारात्मक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु झाला असून राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य मतदारांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान होईल, असाही अंदाज वर्तवला जात आहे. आगामी काळात महाराष्ट्रासह एकूण 3 राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक तारखा एकाचवेळी जाहीर होतील. तर झारखंडच्या निवडणुकांच्या तारखा नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील, असा अंदाज आहे.

राज्यात 22 ऑक्टोबरपर्यंत नवी विधानसभा अस्तित्वात येणार असल्याची माहिती मिळते आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान 31 दिवस आवश्यक आहे. त्यामुळे आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच राज्यभरात आचारसंहिता लागू होईल. दिवाळी 25 ऑक्टोबरला असल्यामुळे त्यापूर्वीच मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याकडे निवडणूक आयोगाचा कल असेल. मंत्रिमंडळ अस्तित्वात येण्यासाठी मात्र दिवाळीनंतरचा मुहूर्त लागेल.

सर्वच पक्षांची तयारीला सुरुवात
महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. निवडणुकांसाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना-भाजप युतीमध्ये लढणार असल्याचं सांगत असले तरी अंतिम निर्णय झालेला नाही. दोन्ही पक्षांकडून स्वबळाची चाचपणी सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून, दोन्ही पक्ष 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येणार आहेत.

अद्यापही युतीच तळ्या मळ्यात
शिवसेना भाजप युतीच अद्यापही तळ्यात मळ्यात असल्याची स्थिती दिसत आहे. कोणताही नेता ठोस यावर बोलायला तयार नाही. सातत्याने सेना भाजपमध्ये इनकमिंग सुरु आहे. दोन्ही पक्षाचे नेते युती होणार सांगत असले तरी किती जागांवर कोण लढणार हे अद्याप ठरले नाही. त्यामुळे युती होणार की नाही हा प्रश्न उपस्थितहोत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रविवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. यावेळी युतीची घोषणा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

आघाडीचाही निर्णय अद्याप बाकी

आघाडीचाही अद्याप निर्णय झाला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी १२५-१२५ जागा लडणार असल्याची माहिती मिळते आहे. तर मित्रपक्षांना ३८ जागा लढवणार आहेत.

Intro:Body:

barate

Conclusion:
Last Updated : Sep 21, 2019, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.