श्रीनगर - देशात सगळीकडे रमजान ईद उत्साहात साजरा केला जात आहे. त्याचप्रमाणे पुंछ जिल्ह्याच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्येही भारतीय जवानांनी मुस्लीम बांधवांसोबत ईद साजरी केली. यावेळी त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
जम्मु काश्मीरमध्ये स्थानिक नागरिक आणि सुरक्षा दलांमध्ये अनेकवेळा धुमश्चक्री होत असते. त्यामुळे कायमच वातावरण चिघळलेले असते. परंतु, ईदमुळे सैन्यदलांमध्ये आणि नागरिकांमध्ये एकोपा पहायला मिळत आहे. यावेळी सैनिकांनी मुस्लीम टोप्या परिधान केल्या होत्या.
ईद मुस्लीम धर्मीयांसाठी महत्वाचा सण आहे. जगभरात मुस्लीम बांधव ईद मोठ्या उत्साहात साजरी करतात. सणाच्या निमित्ताने परस्परांबद्दल मनात असलेली कटुता, राग, द्वेष संपवून शांतता, मैत्रीसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.