ETV Bharat / bharat

नागरिक म्हणाले. .  'धन्यवाद लॉकडाऊन, आम्हाला दारूविना जगायला शिकवल्याबद्दल...' - दारूबंदी आणि लॉकडाऊन

लॉकडाऊनमुळे कित्येक कुटुंबांचा रोजगार हिरावला. कित्येकांवर उपासमारीची वेळ आली. तर, दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेकांना दारू मिळत नसल्याने हळूहळू त्यांची या सवयीतून मुक्तता झाली. यातीलच काहीजणांनी या लॉकडाऊनच्या परिस्थितीला धन्यवाद म्हणत, आभार व्यक्त केले आहे.

'धन्यवाद लॉकडाऊन, दारूविना जगायला शिकवल्याबद्दल...'

author img

By

Published : Apr 24, 2020, 11:54 AM IST

रायपूर - कोरोनाच्या या संकटकाळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांचेच घरातून बाहेर पडणे बंद झाले आहे. तर, अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. त्यात दारूची दुकानेही बंद असल्यामुळे तळीरामांचे हाल होत आहेत. मात्र, दुसरीकडे काही ठिकाणी या लॉकडाऊनमुळे काही जणांची दारू पिण्याची सवय सुटल्याने त्यांनी लॉकडाऊनलाच धन्यवाद म्हणून आभार व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये काहीजण दारू मिळत नसतानाही आता आधीपेक्षा बरं वाटायला लागलं आहे. 'थँक यू लॉकडाऊन' आम्हाला दारूविना जगायला शिकवल्याबद्दल, असे म्हणाताना दिसत आहेत.

धन्यवाद लॉकडाऊन, आम्हाला दारूविना जगायला शिकवल्याबद्दल

याबाबत मेडीकल कॉलेजचे डॉ. सुमित श्रीवास्तव म्हणाले, दररोज दारू पिणाऱ्या व्यक्तीला अचानक दारू मिळणे बंदच झाले, तर त्यांची प्रकृती बिघडू शकते. मात्र, काही कारणने त्यांना दारू मिळत नसेल आणि आता मी दारू पिणार नाही, असे जर त्यांनी मनात ठरवले. तर, काही दिवस त्यांच्या तब्येतीत बिघाड होईल मात्र, नंतर यशस्वीरित्या त्यांची दारूतून सुटका होऊ शकते.

दुसरीकडे लॉकडाऊनमुळे कित्येक कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. तर, कित्येक कुटुंबातून घरातील कर्त्या व्यक्तीची दारू सुटल्याचा आनंदही आहे. तसेच, दारूमुळे होणारे वादही आता होत नसल्याचे सांगत अनेक कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला.

छत्तीसगड राज्य काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यात दारूबंदी करण्यासंदर्भात घोषणा केली होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर त्या घोषणेवर पाणी पडले आणि दारूंची दुकाने सुरू ठेवण्यासंदर्भात सांगण्यात आले. या दारूबंदीच्या मुद्द्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच पेटले होते. मात्र, आताच्या संकटकाळी बंद पडलेल्या दारू दुकानांमुळे समाजात सकारात्मक परिणाम दिसू लागले आहे. परंतु, लॉकडाऊन उठल्यावर राज्य प्रशासन दारूच्या दुकानांसदर्भात काय पाऊल उचलते हे बघण्यासारखे असणार हे मात्र, नक्की!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.