ETV Bharat / bharat

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : अखेर त्या कुटुंबीयांकरता रेशन धान्य घेऊन पोहोचले प्रशासन

देशभरात लॉकडाऊनच्या परिस्थितीत सरकार गरजवंतांपर्यंत अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहे. मात्र, जयपूरमध्ये लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या एका परिवाराला २१ दिवस होऊनही मदत पोहोचली नव्हती, याबाबत 'ईटीव्ही भारत'ने वृत्त प्रकाशित करताच शासनाकडून तत्काळ या परिवाराला मदत पोहोचविण्यात आली.

अखेर त्या कुटुंबियांसाठी रेशन धान्य घेऊन पोहोचले प्रशासन

author img

By

Published : Apr 16, 2020, 12:44 PM IST

जयपूर - कोरोना संसर्गापासून खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर १४ एप्रिलला पंतप्रधान मोदी यांनी या लॉकडाऊनला ३ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. मात्र, या घोषणेनंतर जयपूरसारख्या परराज्यात अडकून पडलेल्या अनेक स्थलांतरित कामगार, मजुरवर्गाच्या संकटात आणखी भर पडली. ज्यांचं पोट रोजंदारीवर भरतं, अशांनी या कठिण परिस्थितीत काय करावं, हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे ठाकून उभा होता. तर, उपासमारीने अनेकांपुढे अंधारी आली. मात्र, 'ईटीव्ही भारत'ने दिलेल्या वृत्तानंतर राज्य, जिल्हा प्रशासनाकडून या गरजूंना अन्नधान्य पुरवठा करण्यात आल्यानंतर अनेकांच्या जीवात जीव आला.

अखेर त्या कुटुंबियांसाठी रेशन धान्य घेऊन पोहोचले प्रशासन

'ईटीव्ही भारत'ने ब्रम्हपुरीतील रहिवासी बनवारी सोनी, गोकुलेंद्र शर्मा आणि महेश शर्मा यांच्यासह त्यांच्या परिवार जो जयपूरमध्ये अडकून पडला असल्याचे सांगत त्यांची परिस्थिती मांडली होती. यावर नगरपालिका प्रशासनाने त्याची दखल घेतली. ते या कुटुंबापर्यंत पोहोचले आणि त्यांना अन्नधान्य उपलब्ध करुन दिले. यामध्ये, ५ किलो गव्हाचं पीठ, १ किलो डाळ, १ किलो तांदुळ, अर्धा किलो तेल आणि तिखट, हळद, मीठाचे पॅकेट दिले.

अन्नधान्य मिळाल्यानंतर या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते, त्यांनी 'ईटीव्ही भारत'चे आभार मानले. सोबतच, त्यांच्यासारखे अन्य जे नागरिक अडकून पडले आहेत त्यांचीही अशीच मदत करावी असे निवेदन या कुटुंबीयांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले. सोबतच, प्रशासनानेही त्यांच्याकडे डोळेझाक न करता या संकटकाळी मदतकार्य पोहोचवावी, अशी आशाही व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.