ETV Bharat / bharat

'हुधुद' चक्रीवादळग्रस्तांना ईनाडू-रामोजी समुहाने 64 घरे दिली बांधून

ईनाडू-रामोजी समुहाने श्रीकाकुलम जिल्ह्यातील बोम्मली क्षेत्रामध्ये आवश्यक सुविधायुक्त 64 घरांचे निर्माण केले. गुरुवारी चक्रीवादळग्रस्तांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या. ईनाडू-रामोजी समुहाने यापूर्वीही अनेकदा नैसर्गिक संकटावेळी मदत केली आहे.

हुधुद
हुधुद
author img

By

Published : Sep 12, 2020, 3:04 PM IST

हैदराबाद - 'हुधुद' चक्रीवादळ 2014 मध्ये आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले. वादळाच्या तडाख्याने अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले. 'हुधुद'चा फटका बसलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी ईनाडू-रामोजी समुहाने हात पुढे केला आणि 'ईनाडू रिलिफ फंड' ची स्थापना केली. या फंडातून जमा झालेल्या रक्कमेतून श्रीकाकुलम जिल्ह्यातील बोम्मली क्षेत्रामध्ये आवश्यक सुविधायुक्त 64 घरांचे निर्माण केले. ही घर उभारण्यात आलेल्या परिसराला 'हुधुद च्रकीवादळ पुनर्वसन कॉलनी' असे नाव दिले आहे. गुरुवारी लाभार्थ्यांना घरांची चावी सोपवण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी रामोजी समुहाने 'हुधुद' चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या नागिकांना रामोजी समुहाने मोलाची मदत केली आहे. बांधकाम करताना साहित्याच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता विक्रमी काम केले आहे, असे जिल्हाधिकारी जे. निवास म्हणाले. तसेच वायएसआर काँग्रेसचे नेते दुव्वादा श्रीनिवास यांनीही रामोजी समुहाच्या कार्याचे कौतूक केले आहे. तर लाभार्थ्यांनी रामोजी रावांचे आभार मानले आहेत.

क्रीवादळग्रस्तांना ईनाडू-रामोजी समुहाची मदत

ईनाडू-रामोजी समुहाने समुहाने 'हुधुद' चक्रीवादळचा फटका बसलेल्या लोकांसाठी तीन कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. संस्थेने सर्वसामान्यांना मदतीची हाक दिली. तेव्हा अनेकांनी पुढे येऊन एकूण 3.16 कोटींची देणगी दिली. एकूण 6 कोटी 16 लाख निधीमधून विशाखापट्टणम जिल्ह्यातील गटाने वाडापलेम येथे 80 घरे निर्माण केली. त्यानंतर श्रीकाकुलम जिल्ह्यातील मेघवरम गावामध्ये 36, तर उम्मिलाडामध्ये 28 घरे असे एकूण 64 घर उभारली. 28 मे 2016 या घरांच्या निर्मीतसाठी भूमीपूजन करण्यात आले होते. गुरुवारी श्रीकाकुलम जिल्हाधिकाऱ्यांनी या घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यांच्या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.

ईनाडू-रामोजी समुहाने यापूर्वीही अनेकदा नैसर्गिक संकटावेळी मदत केली आहे. केरळला केरळला 2018 मध्ये 'न भूतो न भविष्यति' अशा पूरस्थितीचा सामना करावा लागला होता. अनेक लोक बेघर झाली होती. तेव्हा अलाप्पुझा येथील विस्थापितांना तब्बल 121 घरे बांधून दिली आहेत. गुजरातमधील कच्छ येथील भूकंप, ओडीसामधील चक्रीवादळ, तमिळनाडूच्या किनारपट्टी भागात आलेली सुनामी, कृष्णा व गोदावरी नद्यांना आलेला पूर अशा अनेक संकटामध्ये रामोजी समूहाने मदत केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.