ETV Bharat / bharat

माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांची ११.८६ कोटींची मालमत्ता जप्त

author img

By

Published : Dec 19, 2020, 7:49 PM IST

Updated : Dec 19, 2020, 8:12 PM IST

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांची ११.८६ कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली. संलग्न मालमत्तांमध्ये तीन निवासी घरे समाविष्ट आहेत. यामध्ये श्रीनगरमधील गुपकर रस्त्यावरील घराचा समावेश आहे.

श्रीनगर
श्रीनगर

श्रीनगर : जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील (जेकेसीए) घोटाळ्या प्रकरणात पीएमएलएअंतर्गत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांची ११.८६ कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली. संलग्न मालमत्तांमध्ये तीन निवासी घरे समाविष्ट आहेत. यामध्ये श्रीनगरमधील गुपकर रस्त्यावरील घराचा समावेश आहे.

हे प्रकरण जेकेसीएकडून २००१ ते २०११ या काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राज्यात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात आलेल्या निधीच्या गैरवापराचे आहे. जेकेसीएला २००५-२००६ ते २०११-२०१२ या आर्थिक वर्षात बीसीसीआयकडून ९४.०६ कोटी रुपये देण्यात आले होते.

२०१५ मध्ये जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे सोपविला

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) २०१८ मध्ये अब्दुल्ला यांची पहिल्यांदा चौकशी केली होती. सीबीआयनेही अब्दुल्ला यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अब्दुल्लांची चौकशी सुरू केली. राज्य क्रिकेट असोसिएशनमधील ११३ कोटींच्या घोटाळ्याबाबत ईडीने अब्दुल्लांची अनेकदा चौकशी केली आहे. यापूर्वी सीबीआयने त्यांच्याविरोधात जेकेसीएन निधीतून ४३.६९ कोटींचा गैरव्यवहार आणि गुन्हेगारी कट रचल्याबद्दल माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यासह इतरांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

निवेदनात म्हटले आहे की, 'जेकेसीएच्या तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमधून हे निधी घेण्यात आले. जेकेसीएच्या नावावर अनेक खाती उघडली गेली, ज्यात निधी हस्तांतरित करण्यात आला. अस्तित्त्वात असलेल्या बँक खात्यांसह अशी अन्य बँक खाती नंतर जेकेसीएच्या निधीच्या गैरव्यवहारासाठी वापरली जात होती. अब्दुल्ला यांच्या व्यतिरिक्त एफआयआरमध्ये जेकेसीएचे सरचिटणीस सलीम खान, कोषाध्यक्ष मोहम्मद अहसान मिर्झा आणि जम्मू-काश्मीर बँकेचे कार्यकारी बशीर अहमद मनाशीर यांची नावे आहेत. या लोकांवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे.

Last Updated : Dec 19, 2020, 8:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.