नवी दिल्ली - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रमाचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात मनी लाँडरिंग (आर्थिक गैरव्यवहार) प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच जमातीशी जोडले गेलेल्या 1 हजार 900 लोकांना ईडीकडून लुकआऊट नोटीस जारी केले आहे.
गुरुवारी मौलाना साद यांच्या चार नातेवाईकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 मार्चनंतर मरकज कार्यक्रमाला हजेरी लावल्याबाबतची माहिती उघड करत नसल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. सतत आवाहन केल्यानंतरही त्यांनी पोलिसांना माहिती दिली नाही, असे सहारनपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
राजधानी दिल्लीतील मरकज निजामुद्दीन येथे मार्च महिन्यात तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाला विदेशातूनही मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. यातील अनेकांना कोरोना असल्याचे नंतर तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे भारतात कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला.