ETV Bharat / bharat

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्याला अटक; ईडीची कारवाई - सेंट्रल बँक ऑफ इंडिया

सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ३५४ कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा आणि मोजर बेयरचा माजी कार्यकारी संचालक रतुल पुरी याला अटक करण्यात आली आहे. सक्तवसुली संचलनालयाने ही कारवाई केली आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्याला अटक
author img

By

Published : Aug 20, 2019, 12:20 PM IST

Updated : Aug 20, 2019, 1:01 PM IST

भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा आणि मोजर बेयरचा माजी कार्यकारी संचालक रतुल पुरी याला सक्तवसुली संचलनालय (ईडी) ने अटक केली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ३५४ कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी रतुल पुरीला अटक करण्यात आली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने रतुल पुरी, त्यांची कंपनी, वडील आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक पुरी, आई शमिल नीता पुरी, संजय जैन आणि विनीत शर्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या सर्वांवर फसवणूक, कथितरित्या गुन्हेगारीचा कट आणि भ्रष्टाचारासारखे आरोप होते. तर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ३ दिवसांनी सक्तवसूली संचलनालयाने ही कारवाई केली आहे.

सीबीआईने रविवारी आरोपीचे घर आणि कंपनीसहित ६ ठिकाणी छापे टाकले होते. दरम्यान, बँकेने म्हटले आहे, की रतुलने २०१२ साली कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिला होता. परंतु त्याचे आई-वडिल संचालक मंडळावर कार्यरत आहेत.

रतुल पुरी यांची आई नीता पुरी या मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांची बहिण आहे. रतुल पुरी ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातही तपासात आहेत. त्यांच्यावर कंपनीद्वारे कथितरित्या लाच घेतल्याचा आरोप आहे. रतुल पुरी यांच्या कंपनीशी संबंधित असलेल्या खात्यांचा समावेश लाच घेण्यासाठी केला गेल्याचा सक्तवसूली संचलनालयाचा आरोप आहे.

Intro:Body:

ED arrested KamalNath nephew Ratul Puri in bank scam

Conclusion:
Last Updated : Aug 20, 2019, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.