नवी दिल्ली - पूर्व दिल्लीला नुकताच भूकंपाचा धक्का बसला आहे. ३.५ रिश्टर स्केल मॅग्निट्यूडचा हा भूकंप होता, अशी माहिती मिळाली आहे. संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमारास पूर्व दिल्लीतील लोकांना मोठ्या आवाजासह या भूकंपाचे हादरे जाणवले.
भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. या भुकंपाचे केंद्र जमीनीखाली आठ किलोमीटर होते. यामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त अद्याप समोर आले नाही.