नवी दिल्ली - देशाच्या राजधानीला पुन्हा भूकंपाचे धक्के बसले आहेत. हरियाणाच्या रोहतकमध्ये या भूकंपाचे केंद्रस्थान होते. रात्री नऊ वाजून आठ मिनिटांनी हा भूकंप झाला.
राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, रिश्टर स्केलवर ४.६ अंश तीव्रतेचा हा भूकंप होता. तर भूकंपाचा केंद्रबिंदू हा जमीनीखाली १६ किलोमीटरवर होता. या भूकंपाचे हादरे संपूर्ण दिल्लीमध्ये जाणवले.