दिगलीपूर : अंदमान-निकोबार बेटांवरील दिगलीपूरजवळ आज (रविवार) सकाळी भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर ४.१ तीव्रतेचा हा भूकंप होता. यामध्ये कोणतीही जीवीत वा वित्तहानी झाल्याचे अद्याप समोर आले नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. यासोबतच, आज मणिपूरमध्येही साधारणपणे ४.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
यापूर्वी २७ जूनला, हरियाणाच्या रोहतकमध्ये २.४ रिश्टर स्केलचा एक भूकंप झाला होता. या भूंकपाचे केंद्रस्थान जमीनीच्या खाली तीन किलोमीटर होते.
तसेच, शनिवारी जम्मू आणि काश्मीरच्या हान्ले प्रांतामध्ये ४.४ रिश्टर स्केलचा एक भूकंप झाला होता.
मागील दोन आठवड्यांमध्ये नवी दिल्लीमध्ये जवळपास १६ भूकंपाचे धक्के बसले आहेत.
भूकंपशास्त्रज्ञांच्या मते भूंकपांचे प्रमाण वाढले असले, तरी यापुढे आणखी मोठा भूकंप येईल की नाही याबाबत सांगता येत नाही. इतर नैसर्गिक आपत्तींप्रमाणे भूंकप येईलच-किंवा नाही येणार हे खात्रीने सांगता येत नाही.
हेही वाचा : जगभरात 1 कोटी 75 हजार 111 कोरोनाग्रस्त; तर 5 लाख 626 जणांचा बळी