नवी दिल्ली - एनसीआर आणि दिल्ली भागातआज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली, गाजियाबाद, मुजफ्फरनगर, नोएडामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले. उत्तर प्रदेशमधील 'बागपत' येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगितले जात आहे.
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. मुजफ्फरनगरच्या नैऋत्य दिशेला ४४ किलोमीटर अंतरावर ४.० रिश्टर स्केल येवढी भूकंपाची तीव्रता होती. भूकंपानंतर काही ठिकाणी लोकांनी घराबाहेर पळ काढला. अद्याप कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. काही दिवसांपूर्वी या भागांत भूकंप झाला होता, आज सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.