ETV Bharat / bharat

उत्तराखंडमध्ये भूकंपाचा धक्का, शास्त्रज्ञांनी वर्तवली मोठ्या धोक्याची शक्यता - बागेश्वर भूंकप

भूकंपाची खोली जितकी जास्त असेल तितका भूकंपाचा परिणाम कमी होईल. रात्री उशिरा झालेल्या या भूकंपाची खोली सुमारे 100 किलोमीटर होती. त्यामुळे कोणताही मोठा परिणाम झाला नाही.

उत्तराखंडमध्ये भूकंपाचा धक्का
उत्तराखंडमध्ये भूकंपाचा धक्का
author img

By

Published : Apr 2, 2020, 2:43 PM IST

नैनीताल - उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बागेश्वरसह हिमालयी क्षेत्रांमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती. रुद्रप्रयागसह पिथौरागड, धारचूला क्षेत्रात आलेल्या या भूकंपाने नागरिकांसह भूगर्भशास्त्रज्ञांमध्येही खळबळ उडाली आहे.

भूकंपाची खोली जितकी जास्त असेल तितका भूकंपाचा परिणाम कमी होईल. रात्री उशिरा झालेल्या या भूकंपाची खोली सुमारे 100 किलोमीटर होती. त्यामुळे, कोणताही मोठा परिणाम झाला नाही.

उत्तराखंड राज्याला अनेकदा भूकंप आणि महापूरसारख्या नैसर्गिक संकटांचे सामने करावे लागत आहेत. अशात आता शास्त्रज्ञांच्या मते राज्यातील पहाडी भागांमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते दर दीडशे ते दोनशे वर्षांनंतर एक मोठा भूकंप होतो. १५० वर्षांपूर्वी असाच एक विनाशकारी भूकंप आला होता. आता ज्याप्रकारचे अधिक तीव्रतेचे भूकंप येत आहेत, त्यावरून भविष्यात असाच विनाशकारी भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.