ETV Bharat / bharat

झारखंडच्या ४५ अल्पवयीन मुलींची तस्करीपासून सुटका; दिल्ली महिला आयोगाची कारवाई

आयोगातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात झारखंडच्या कित्येक मुलींना दिल्लीच्या विविध भागांतून वाचवण्यात आले होते. नोकरीच्या आमिषाने या मुलींना दिल्लीला आणले जात, आणि विविध भागांमध्ये त्यांची विक्री केली जात होती. महिला आयोगाने अशा ४५ मुलींना झारखंडला परत पाठवले आहे..

DWC saved 45 minor girls from trafficking sent them back to Jharkhand by air
झारखंडच्या ४५ अल्पवयीन मुलींना तस्करीपासून वाचवले; दिल्ली महिला आयोगाची कारवाई
author img

By

Published : Nov 8, 2020, 5:24 PM IST

नवी दिल्ली - मानवी तस्करीबाबत दिल्लीच्या महिला आयोगाने आज एक मोठी कारवाई केली आहे. तब्बल ४५ अल्पवयीन मुलींची तस्करी रोखण्यात आयोगाला यश मिळाले आहे. या सर्व मुली झारखंडच्या होत्या. त्यांना विमानाने आपल्या राज्यात सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना सोरेन यांनी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांचे कौतुक करत आभार मानले आहेत.

आयोगातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात झारखंडच्या कित्येक मुलींना दिल्लीच्या विविध भागांतून वाचवण्यात आले होते. नोकरीच्या आमिषाने या मुलींना दिल्लीला आणले जात, आणि विविध भागांमध्ये त्यांची विक्री केली जात होती. या घटना समोर आल्यानंतर झारखंडच्या आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती देण्यात आली होती. वाचवण्यात आलेल्या मुलींना लवकरात लवकर झारखंडला परत पाठवत असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सोरेन यांना सांगितले होते. यानंतर या मुली आता सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचल्या आहेत.

कडक कारवाईचे आदेश..

नोकरीचे आमिष दाखवून असे प्रकार करणाऱ्या सर्व प्लेसमेंट सेल्सवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, अशा सर्व अवैध एजन्सींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मालीवाल यांनी दिले आहेत. यासोबतच, झारखंडला परत गेलेल्या मुलींच्या पुनर्वसनासाठीही काम सुरू असल्याची माहिती मालीवाल यांनी दिली.

हेही वाचा : 'दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट'; आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कबुली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.