ETV Bharat / bharat

शेतकऱ्यांसाठी सोन्याची खाण आहे 'हे' फळ; एकदा पीक घ्याल तर पुढील २५ वर्षे फायदाच-फायदा..

ड्रॅगनफ्रुट हे एक विदेशी फळ आहे. या फळाला 'सुपर फ्रूट' समजले जाते. थायलंड, व्हिएतनाम, इस्राईल, श्रीलंका आणि मध्य आशियामध्ये मोठ्या प्रमाणात या फळाचे उत्पादन होते. आता भारतातही काही ठिकाणी याचे पीक घेण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यामध्येही आता ड्रॅगनफ्रुटचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ लागले आहे.

ड्रॅगनफ्रुट
ड्रॅगनफ्रुट
author img

By

Published : Nov 20, 2020, 6:24 AM IST

उन्नाव (उत्तर प्रदेश) - ड्रॅगनफ्रुटची शेती शेतकऱ्यांसाठी एखाद्या सोन्याच्या खाणीप्रमाणे आहे. एकदा याचे पीक घेतल्यानंतर पुढील तब्बल २५ वर्षे यातून ते नफा मिळवू शकतात. ऐकायला खोटे वाटत असले तरी हे १०० टक्के खरे आहे. आणि असे आम्ही नाही, तर शेतकरीच स्वतः सांगत आहेत. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सर्वात चांगले पीक म्हणजे ड्रॅगनफ्रुट.

शेतकऱ्यांसाठी सोन्याची खाण आहे 'हे' फळ

ड्रॅगनफ्रुट हे एक विदेशी फळ आहे. या फळाला 'सुपर फ्रूट' समजले जाते. थायलंड, व्हिएतनाम, इस्राईल, श्रीलंका आणि मध्य आशियामध्ये मोठ्या प्रमाणात या फळाचे उत्पादन होते. आता भारतातही काही ठिकाणी याचे पीक घेण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यामध्येही आता ड्रॅगनफ्रुटचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ लागले आहे.

दीड वर्षांमध्ये रोपे मोठी झाली

मी याबाबत यूट्यूबवर माहिती पाहिली. हे फळ मुख्यतः मध्य आशिया वगैरे भागांमध्ये घेतले जाते. मी इंटरनेटवर सर्च केल्यावर समजले, की कोलकातामध्ये याची रोपे मिळत आहेत. त्यानंतर मी माझ्या मुलाला कोलकात्याला पाठवून ही रोपे आणली. साधारणपणे दीड वर्षांमध्ये ही रोपे मोठी झाली. या सर्वाचा एकूण खर्च सात लाख आला. आम्हाला सुरुवातीला वाटले, की आमच्या भागातील हवामानानुसार इथे हे पीक येणार नाही. मात्र यावर्षी झाडांना फळे लागलेली पाहून आम्ही बरेच आनंदी झालो. ही झाडे आता २५ वर्षांपर्यंत फळे देतील, असे आम्हाला समजले. आम्ही या झाडांना प्रामुख्याने नैसर्गिक खत घालतो. रासायनिक खतांचा वापर आम्ही टाळतो, असे शेतकरी विनोद कुमार गुप्ता म्हणाले.

ड्रॅगनफ्रुट गुलाबी रंगाचे असते. जे दिसायला खूप आकर्षक आहे. शिवाय याची चवही उत्कृष्ट असते. परदेशात या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सुमारे ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो या दराने ड्रॅगनफ्रुटची विक्री होते. आरोग्यासाठी फायद्याचे असल्यामुळे महाग असूनही या फळाला अधिक मागणी आहे. त्यामुळे अधिक पैसे मिळवण्याच्या दृष्टीने शेतकरी याची शेती करू लागले आहेत.

मे महिन्यापासून फळे येण्यास सुरुवात

आधीच्या पारंपरिक शेतीमध्ये अगदी कमी प्रमाणात नफा होत होता. त्यामुळे मी त्यात नवीन काय करता येईल, याबाबत इंटरनेटवर माहिती शोधत होतो. मी अनेक प्रकारची शेती पाहिली, मात्र त्यातलं काही मला समजलं नाही. यादरम्यान मला समजलं की काही फळे अशी आहेत, ज्यांचे विदेशात पीक घेतले जाते. मात्र, भारतात चांगली मागणी आहे. त्यानुसार संशोधन केल्यानंतर मी ड्रॅगनफ्रुटची शेती करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मी ही रोपे लावली होती. यावर्षीच्या मे महिन्यापासून फळे येण्यास सुरुवात झाली, असे शेतकरी विनोद कुमार गुप्ता म्हणाले.

कोरोना महामारी आल्यानंतर बाजारातील ड्रॅगनफ्रुटची मागणी अधिक वाढली आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी बरीचशी तत्वे या फळातून आपल्याला मिळतात. हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगासारख्या आजारांवर हे फळ गुणकारी आहे. या फळात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. तसेच, शरिरातील हाडे, दात यांनाही या फळाचा फायदा होतो. अशाप्रकारे बहुपयोगी असल्यामुळे ड्रॅगनफ्रुटला अधिक मागणी आहे.

तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते

हे फळ तुम्ही विविध प्रकारे खाऊ शकता.. एक म्हणजे साधारणपणे, स्वच्छ धुवून, सोलून आणि कापून.. मात्र दररोज अशा प्रकारे खाणे कंटाळवाणे होऊ शकते.. मग बदल म्हणून तुम्ही सॅलडमध्ये याचा वापर करू शकता, किंवा मग आजकाल याची कँडी किंवा जेलीही बनत आहे.. काही ठिकाणी हे फळ कॉकटेलसोबतही सर्व्ह केले जात आहे.. आंबट-गोड चव असल्यामुळे विविध प्रकारे हे फळ खाल्ले जाऊ शकते.. तुम्ही याचा ज्यूस बनवू शकता, किंवा स्मूदी बनवू शकता.. हे फळ तुमची रोगप्रतिकारशक्ती तर वाढवतेच, सोबतच तुमच्या त्वचेलाही यामुळे चकाकी येते, असे आयएचएम लखनऊचे विभागप्रमुख आर. के. सिंह म्हणाले.

जनावरेही या झाडापासून दूर राहतात

ड्रॅगनफ्रुट हे निवडुंगाच्या प्रजातीमधील एक झाड आहे. त्यामुळे कमी पाण्यामध्ये याची शेती करणे शक्य आहे.. तसेच, जनावरेही या झाडापासून दूर राहतात.. त्यामुळे ड्रॅगनफ्रुटची शेती ही सर्वार्थाने शेतकऱ्यांना फायद्याची आहे.

काही दिवसांपूर्वी आम्हाला समजले, की उन्नावच्या बांगरमऊ भागातील एका शेतकऱ्याने ड्रॅगनफ्रुटची शेती केली आहे. यासाठी नक्कीच तो शेतकरी अभिनंदनास पात्र आहे. अशा शेतकऱ्यांना पाहून इतरांना प्रेरणा मिळावी, यासाठी आम्ही कृषी अधिकाऱ्यांना असे निर्देश दिले आहेत, की जिल्हा स्तरावर अशा अभिनव शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात यावा, असे उन्नावचे जिल्हाधिकारी रवींद्र कुमार म्हणाले.

पारंपरिक प्रकारच्या शेतीसोबतच, अशा प्रकारची वेगळी पिके घेण्याचा प्रयत्नही शेतकऱ्यांनी केला, तर खऱ्या अर्थाने ते आत्मनिर्भर होण्यास मदत होईल, हे नक्की!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.