ETV Bharat / bharat

'तबलिगी जमात' प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नका; आंध्रच्या मुख्यमंत्र्यांचे आवाहन..

आपल्या देशामध्ये अनेक धर्मगुरू आहेत. यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रवी शंकर, इशा फाऊंडेशनचे जग्गी वासुदेव, माता अमृतानंदामयी, पॉल दिनाकरन आणि जॉन वेस्ली अशा धर्मगुरूंचा समावेश आहे. त्यांचे जगभरामध्ये लाखो भक्त आहेत. त्यांच्यापैकी कोणाचाही कार्यक्रम असता, तरी याप्रकारची दुर्घटना घडली असती. त्यामुळे या प्रकाराकडे केवळ एक दुर्दैवी घटना म्हणून पहावे. असे आवाहन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी केले आहे.

dont-give-tablighi-jamaat-religious-colour-ap-cm
'तबलिगी जमात' प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नका; आंध्रच्या मुख्यमंत्र्यांचे आवाहन..
author img

By

Published : Apr 5, 2020, 11:53 AM IST

अमरावती - दिल्लीमध्ये पार पडलेला निझामुद्दीन मरकज हा कार्यक्रम एक धार्मिक सोहळा होता. या कार्यक्रमाकडे कोणीही गुन्हा म्हणून पाहू नये, असे आवाहन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी केले आहे.

मरकजमुळे जे झाले, ते इतर कोणत्याही धर्माच्या कार्यक्रमामुळे झाले असते. मरकजमध्ये इतर देशांमधील नागरिकही सहभागी होते, ज्यांनी भारतात कोरोना आणला. या कार्यक्रमामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्यासारखी घटना खरोखरच दुर्दैवी आहे. मात्र, कोरोनाच्या रुग्णांवर आपण विशिष्ट धर्माचा शिक्का मारणे योग्य नाही, असे जगनमोहन यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.

आपल्या देशामध्ये अनेक धर्मगुरू आहेत. यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रवी शंकर, इशा फाऊंडेशनचे जग्गी वासुदेव, माता अमृतानंदामयी, पॉल दिनाकरन आणि जॉन वेस्ली अशा धर्मगुरूंचा समावेश आहे. त्यांचे जगभरामध्ये लाखो भक्त आहेत. त्यांच्यापैकी कोणाचाही कार्यक्रम असता, तरी याप्रकारची दुर्घटना घडली असती. त्यामुळे या प्रकाराकडे केवळ एक दुर्दैवी घटना म्हणून पहावे. याला धार्मिक रंग दिल्यामुळे आपण सर्व एक आहोत या संदेशाला तडा जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कोरोना विषाणूवर कोणतेही औषध नाही. कोरोना विषाणूचा कोणताही धर्म नाही. हा विषाणू गरीब-श्रीमंत असा किंवा देशादेशांमध्ये भेदभाव करत नाही. या लढाईमध्ये सर्व मानवजातीचा एकच अदृश्य शत्रू आहे, तो म्हणजे कोरोना विषाणू! असे जगनमोहन म्हणाले. यासोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदीनी दिवे लावण्याबाबत केलेल्या आवाहनाबद्दल बोलताना ते म्हणाले, की या उपक्रमामधून आपण सर्व एक आहोत हा संदेश देणे गरजेचे आहे.

हेही वाचा : 'टाळी वाजवून अन् दिवे लावून समस्या सुटणार नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.