ETV Bharat / bharat

आम आदमी पक्षाशी युती करू नका; शीला दीक्षित यांचे राहुल गांधींना पत्र - CINGRESS

काँग्रेसने दिल्लीत आम आदमी पक्षाशी युती करावी की नाही यावर कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. शक्ती अॅपच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले होते. जवळपास ५२ हजार कार्यकर्त्यांची मते मागविण्यात आली होती.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित
author img

By

Published : Mar 19, 2019, 1:23 PM IST

नवी दिल्ली - देशाच्या राजधानी सत्ताधारी भाजपच्या विरोधात काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची युती होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण, ही शक्यता आता मावळताना दिसत आहे. आम आदमी पक्षाने युतीची वेळ निघून गेल्याचे सांगितले आहे. तर, काँग्रेसच्या नेत्या शीला दीक्षित यांनी युती न करण्याविषयी राहुल गांधींना पत्र लिहून कळवले आहे.

काँग्रेसने दिल्लीत आम आदमी पक्षाशी युती करावी की नाही यावर कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. शक्ती अॅपच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले होते. जवळपास ५२ हजार कार्यकर्त्यांची मते मागविण्यात आली होती. पण या सर्वेक्षणाला काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी विरोध दर्शविला होता. आता त्यांनी यासंबंधी थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी आम आदमी पक्षाशी युती न करण्यासंबंधी सांगितले आहे. यामुळे काँग्रेसचे नुकसान होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

दुसऱ्या बाजुला काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व आम आदमी पक्षासोबत युती करण्याविषयी सकारात्मक आहेत. या नेत्यांनी राहुल गांधींना सर्वेक्षण दाखवले. ज्यात आम आदमी पक्षाच्या खात्यात २८ टक्के मते, काँग्रेसच्या खात्यात २२ टक्के मते, तर भाजपच्या खात्यात ३५ टक्के मते आली आहेत. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची युती झाली तर ते भाजपला पिछाडीवर टाकू शकतात. दिल्लीतील सातही जागावर विजय मिळवायचा असेल, तर युती आवश्यक असल्याचे केंद्रीय नेत्यांचे मत आहे.

Intro:Body:

Don't do allience with AAP, shiela dixit writes letter to rahul gandhi

आम आदमी पक्षाशी युती करू नका; शीला दीक्षित यांचे राहुल गांधींना पत्र

नवी दिल्ली - देशाच्या राजधानी सत्ताधारी भाजपच्या विरोधात काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची युती होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण, ही शक्यता आता मावळताना दिसत आहे. आम आदमी पक्षाने युतीची वेळ निघून गेल्याचे सांगितले आहे. तर, काँग्रेसच्या नेत्या शीला दीक्षित यांनी युती न करण्याविषयी राहुल गांधींना पत्र लिहून कळवले आहे. 

काँग्रेसने दिल्लीत आम आदमी पक्षाशी युती करावी की नाही यावर कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. शक्ती अॅपच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले होते. जवळपास ५२ हजार कार्यकर्त्यांची मते मागविण्यात आली होती. पण या सर्वेक्षणाला काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी विरोध दर्शविला होता. आता त्यांनी यासंबंधी थेट काँग्रेस  अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी आम आदमी पक्षाशी युती न करण्यासंबंधी सांगितले आहे. यामुळे काँग्रेसचे नुकसान होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. 

दुसऱ्या बाजुला काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व आम आदमी पक्षासोबत युती करण्याविषयी सकारात्मक आहेत. या नेत्यांनी राहुल गांधींना सर्वेक्षण दाखवले. ज्यात आम आदमी पक्षाच्या खात्यात २८ टक्के मते, काँग्रेसच्या खात्यात २२ टक्के मते, तर भाजपच्या खात्यात ३५ टक्के मते आली आहेत. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची युती झाली तर ते भाजपला पिछाडीवर टाकू शकतात. दिल्लीतील सातही जागावर विजय मिळवायचा असेल, तर युती आवश्यक असल्याचे केंद्रीय नेत्यांचे मत आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.