वॉशिंग्टन - जम्मू-काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा वक्तव्य केले आहे. भारत आणि पाकिस्तान तयार असेल तर काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी मी मध्यस्थी करायला तयार आहे, असे ट्रम्प म्हणाल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
-
US President Donald Trump yesterday: If I can.. if they wanted me to, I would certainly intervene(on Kashmir issue) pic.twitter.com/k3PZbCozmr
— ANI (@ANI) August 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">US President Donald Trump yesterday: If I can.. if they wanted me to, I would certainly intervene(on Kashmir issue) pic.twitter.com/k3PZbCozmr
— ANI (@ANI) August 2, 2019US President Donald Trump yesterday: If I can.. if they wanted me to, I would certainly intervene(on Kashmir issue) pic.twitter.com/k3PZbCozmr
— ANI (@ANI) August 2, 2019
मोदींनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी मला विनंती केली होती, असे ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अमेरिका दौऱ्यावेळी सांगितले होते. मात्र, भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे. परंतु, मध्यस्थी करायला तयार असल्याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी पुन्हा केला आहे. मी इम्रान खान आणि नरेंद्र मोदी दोघांशीही बोललो आहे, ते दोघेही खूप चांगले आहेत. दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याचा निर्णय आता मोदींच्या हातात आहे. मी याप्रश्नी मदत तयार करण्यास तयार असल्याचे ट्रम्प म्हणाले.
दोन्ही देशांमध्ये काश्मीर प्रश्न खूप काळापासून सुरू आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगले संबध निर्माण होऊ शकतात, याची मी कल्पना करु शकतो, असेही ट्रम्प म्हणाले.
-
EAM Dr.S Jaishankar: Have conveyed to American counterpart US Secretary of State Mike Pompeo this morning in clear terms that any discussion on Kashmir, if at all warranted, will only be with Pakistan and only bilaterally. pic.twitter.com/I6xNmxxi6r
— ANI (@ANI) August 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">EAM Dr.S Jaishankar: Have conveyed to American counterpart US Secretary of State Mike Pompeo this morning in clear terms that any discussion on Kashmir, if at all warranted, will only be with Pakistan and only bilaterally. pic.twitter.com/I6xNmxxi6r
— ANI (@ANI) August 2, 2019EAM Dr.S Jaishankar: Have conveyed to American counterpart US Secretary of State Mike Pompeo this morning in clear terms that any discussion on Kashmir, if at all warranted, will only be with Pakistan and only bilaterally. pic.twitter.com/I6xNmxxi6r
— ANI (@ANI) August 2, 2019
ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याबाबतचा प्रस्ताव भारताने नाकारला आहे. भारत पाकिस्तान वाद हा द्विपक्षीय मुद्दा असून यामध्ये इतर काणीही पडणार नाही, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मिशेल पोम्पेओ यांना सांगितले. ९ व्या पूर्व आशियायी परराष्ट्र मंत्री बैठकी दरम्यान त्यांनी पोम्पेओ यांच्याशी चर्चा केली.